महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये आता 10 फिल्टर, असं बदला कॉल दरम्यान पाठीमागचं बॅकग्राउंड - LOW LIGHT MODE ON WHATSAPP

व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलसाठी लो लाइट मोड आता प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. हा मोड कसा सक्रिय करायचा के पाहूया...

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 16, 2024, 5:21 PM IST

हैदराबाद Low light mode on WhatsApp :व्हॉट्सॲपनं या महिन्याच्या सुरुवातीला व्हिडिओ कॉलसाठी नवीन फिल्टर आणलं होतं. यासोबतच त्यांनी व्हिडिओ कॉलसाठी कमी प्रकाश पर्यायांची घोषणा केली होती. नवीन लो लाइट मोड आता प्रत्येकासाठी लाइव्ह खुला करण्यात आला आहे, जो कमी प्रकाश परिस्थितीत वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ कॉलचा अनुभव सुधारतोय. व्हॉट्सॲपनं एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली की व्हॉट्सॲपवर टच अपसह लो लाइट मोड वापरकर्त्यांना नैसर्गिकरित्या त्यांच्या सभोवतालचं सौंदर्य आणि ब्राईटनेस वाढवण्यास अनुमती देतोय. ज्यामुळं व्हिडिओ कॉल फिचर अधिकच चांगलं झालं आहे. आपण हे नवीन फिचर कसं वापराचं ते पाहूया...

लाईट मोड कसा चालू करायचा :नवीन कमी लाईट मोड WhatsApp वर चालू असलेल्या व्हिडिओ कॉल दरम्यान फक्त एक टॅप करून सुरू करता येतो. नवीन बल्ब लोगोवर टॅप करून ते लाईट चालू केला जाऊ शकतो.

  • WhatsApp वर जा :
  • कोणालाही व्हिडिओ कॉल करा
  • वरच्या उजव्या कोपर्यात बल्ब लोगोवर टॅप करा
  • व्हिडिओ कॉल दरम्यान कमी लाईट मोड अक्षम करण्यासाठी, तुम्ही बल्ब लोगोवर पुन्हा टॅप करून तो अक्षम करू शकता.
  • WhatsApp व्हिडिओ कॉलसाठी अधिक फिचर

पार्श्वभूमी बदलता येणार : WhatsApp आता तुम्हाला तुमची पार्श्वभूमी बदलण्याची किंवा चालू असलेल्या व्हिडिओ कॉल दरम्यान फिल्टर जोडण्याची परवानगी देतंय. फिल्टरचा उद्देश रंग किंवा इतर गोष्टींसह तुमचा कॉल अधिक सुंदर बनवनं आहे. दरम्यान, पार्श्वभूमी, तुम्हाला तुमचा परिसर खाजगी ठेवण्यास मदत करतं, कारण व्हॉट्सॲपवर कॉफी शॉप्स, लिव्हिंग रूम आणि असे बरेच दृश्य तुम्ही बदलू शकता.

व्हिडिओ कॉलमध्ये 10 फिल्टर :व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये आता 10 फिल्टर आणि 10 बॅकग्राउंड आहेत. फिल्टर पर्यायांमध्ये वॉर्म, कूल, ब्लॅक अँड व्हाइट, लाइट लीक, ड्रीमी, प्रिझम लाइट, फिशये, विंटेज टीव्ही, फ्रॉस्टेड ग्लास आणि ड्युओ टोन यांचा समावेश आहे. पार्श्वभूमी पर्यायांमध्ये ब्लर, लिव्हिंग रूम, ऑफिस, कॅफे, पेबल्स, फूडी, स्मूश, बीच, सनसेट, सेलिब्रेशन आणि फॉरेस्ट यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व फिल्टर आणि बॅकग्राउंड 1:1 आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स दोन्हीशी सुसंगत आहेत.

हे वाचलंत का :

  1. मतदार कार्ड हवरलंय?, घरबसल्या 'असं' काढा मतदार ओळखपत्र; 'असा' करा ऑनलाइन अर्ज
  2. ‘या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव
  3. तुम्ही डिजिटल फसवणुकीला बळी पडलाय का?, 'या' पाच टिप्स फॉलो करून पुढील अनर्थ टाळा

ABOUT THE AUTHOR

...view details