महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

SRO च्या GSAT N2 या उपग्रहाचं SpaceX नं केलं यशस्वी प्रक्षेपण, पहा व्हिडिओ - ISRO GSAT N2 SATELLITE

SpaceX नं इस्रोचा GSAT N2 उपग्रह प्रक्षेपित केला आहे. SpaceX च्या Falcon 9 रॉकेटचा वापर करून GSAT N2 फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आला.

Gsat n2 Communication Satellite
GSAT N2 उपग्रह (SpaceX)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 19, 2024, 10:19 AM IST

हैदराबाद Gsat n2 Communication Satellite :इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सनं फ्लोरिडा येथील कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून इस्रोचा प्रगत संचार उपग्रह GSAT N2 यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या प्रक्षेपणामुळं भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि SpaceX यांच्यात व्यावसायिक सहकार्य सुरू झालंय. SpaceX Falcon 9 रॉकेटनं GSAT N2 एका अचूक कक्षेत ठेवण्यात आलाय. इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडनं प्रक्षेपणाच्या यशाबद्दल माहिती दिलीय.

4 हजार 700 किलो वजनाचा उपग्रह :दुपारी 12.01वा जता ठरल्याप्रमाणे या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 34 मिनिटांनंतर उपग्रह वेगळा झाला आणि नंतर कक्षेत स्थिर करण्यात आला. 4 हजार 700 किलो वजनाचा आणि 14 वर्षांच्या मोहिमेसाठी डिझाइन केलेला, GSAT N2 उपग्रह दळणवळण तंत्रज्ञानात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

थ्रूपुट सॅटेलाइट (HTS) पेलोडनं सुसज्ज :हा उपग्रह का-बँड हाय थ्रूपुट सॅटेलाइट पेलोडसह सुसज्ज आहे. GSAT N2, ज्याला GSAT-20 असंही म्हणतात. हा ISRO च्या सॅटेलाइट सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरनं विकसित केलेला एक संचार उपग्रह आहे. हा उपग्रह का-बँड हाय थ्रूपुट सॅटेलाइट (HTS) पेलोडनं सुसज्ज आहे. हा सेटलाईट 48 Gbps डेटा ट्रान्समिशन क्षमता प्रदान करतो. यामध्ये 32 युजर बीम आहेत, ज्यात ईशान्य प्रदेशात 8 अरुंद स्पॉट बीम आणि उर्वरित भारतामध्ये 24 रुंद स्पॉट बीम आहेत. या 32 बीमना भारतातील केंद्रस्थानी असलेल्या हब स्टेशनद्वारे समर्थित केलं जाईल. इस्रोनं सांगितलं की, त्याचा-बँड HTS कम्युनिकेशन पेलोड सुमारे 48 Gbps थ्रूपुट प्रदान करतो.

इस्त्रोची SpaceX शी हातमिळवणी :ऐतिहासिकदृष्ट्या, इस्रोनं जड उपग्रह प्रक्षेपणासाठी एरियनस्पेसशी सहकार्य केलं आहे. तथापि, Arianespace आणि भारताचे LVM-3 प्रक्षेपण वाहन 4 हजार kg पेलोडपर्यंत मर्यादित असल्यानं ऑपरेशनल रॉकेटची इस्त्रोनं SpaceX शी हातमिळवणी केलीय. त्याचे फाल्कन 9 रॉकेट 4 हजार 700 किलो GSAT-N2 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी निवडलें गेलं. हे सहकार्य अंतराळ संशोधन आणि उपग्रह तैनातीमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारीची वाढती क्षमता दर्शवणार आहे.

हे वाचलंत का :

  1. नवीन टोयोटा कॅमरी 11 डिसेंबरला भारतात करणार एंन्ट्री
  2. माणसं पृथ्वीवर कलंक, गटारासारख्या माणसांनी आत्महत्या करावी, गुगल चॅटबॉटच्या उत्तरानं खळबळ
  3. रोड टॅक्सपासून मुक्ती : वाहन खरेदीवर रोड टॅक्ससह नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट

ABOUT THE AUTHOR

...view details