हैदराबाद : ओपनएआयचा एआय चॅटबॉट चॅटजीपीटी क्रॅश झालं आहे. जगभरातील लोकांना ChatGPT वापरताना समस्या येत आहेत. चॅटजीपीटी वापरकर्ते एक्स प्लॅटफॉर्मवर याबाबत तक्रारी करत आहेत. त्यांना चॅटजीपीटी वापण्यात अडथळे येत आहे. आउटेज ट्रॅक करणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरवर हजारो लोकांकडून चॅटजीपीटीबाबत तक्रारी मिळत आहेत. याबद्दल ओपनएआयकडूनही प्रतिसाद मिळाला आहे.
वापरकर्त्यांच्या तक्रारी
कंपनीच्या डिटेक्ट स्टेटस पेजनुसार, ChatGPT आणि API मध्ये समस्या आहे. कंपनीने पेजवर एक संदेश देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'आम्हाला सध्या API मध्ये त्रुटींची संख्या झपाट्यानं वाढताना दिसतेय. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. चॅटजीपीटी संध्याकाळी 5 वाजल्यापासून बंद आहे. डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, संध्याकाळी 5 वाजता चाट जीपीटीबाबत तक्रारी येण्यास सुरूवात झालीय. तक्रारी अजूनही सुरूच आहेत. त्यामुळं वापरकर्ते सध्या ChatGPT टूल वापरू शकत नाहीत. कंपनी सध्या ChatGPT वर एवढी मोठी समस्या कशामुळं निर्माण झाली याचा तपास करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर, ChatGPT दुरुस्त केलं जाईल. त्यानंतर या समस्येचं कारण काय होतं हे देखील सांगितलं जाईल.