हैदराबाद : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनं काल रात्री त्यांची फ्लॅगशिप सीरीज Galaxy S25 लाँच केली. या सीरीजची प्री-ऑर्डर देखील सुरू झालीय. ही सीरीज 7 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. याबाबत कंपनीनं मोठा खुलासा केला आहे. या मालिकेतील फोन भारतातच तयार केली जाणार आहे. सॅमसंग साउथ वेस्ट आशियाचे अध्यक्ष जेबी पार्क यांनी सांगितलं की, Samsung Galaxy S25 मालिकेचं उत्पादन नोएडामध्ये केलं जाईल.
Galaxy S25 मालिकेचं उत्पादन नोएडा प्लांटमध्ये
कंपनीच्या योजनांविषयी माहिती देताना पार्क म्हणाले की, Galaxy S25 मालिकेचं उत्पादन नोएडा प्लांटमध्ये केलं जाईल. नोएडा येथील हा प्लांट कंपनीच्या सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. पार्क म्हणाले की, सॅमसंगच्या बेंगळुरूस्थित संशोधन आणि विकास केंद्रानं S25 मालिका विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कंपनीचे देशात 400 स्टोअर्स
देशातील लहान शहरांकडून सॅमसंगला मोठ्या अपेक्षा आहेत. या शहरांमध्ये गॅलेक्सी उपकरणांची वाढती मागणी पाहून कंपनीनं एक नवीन रणनीती आखली आहे. सध्या, कंपनीचे देशात 400 स्टोअर्स आहेत, जे या वर्षी दुप्पट करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. ही स्टोअर लहान शहरे आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी संपर्क केंद्र म्हणून काम करतील. पार्क म्हणाले की, सर्व शहरांमध्ये, विशेषतः ग्रामीण बाजारपेठांमध्ये, स्टोअर उघडण्याची रणनीती आहे. त्यामुळं ग्राहकांना फोन आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येईल.
Galaxy S25 मालिकेत तीन फोन लाँच
Galaxy S25 मालिकेत सॅमसंग गॅलेक्सी S25, गॅलेक्सी S25 प्लस आणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. भारतात या मालिकेची सुरुवातीची किंमत 80,999 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची 1,65,999 रुपयांपर्यंत जाते. कंपनीनं या मालिकेत जबरदस्त एआय वैशिष्ट्ये, स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम दिलं आहे.
हे वाचलंत का :