हैदराबाद cat results : विद्यार्थी CAT 2024 परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. CAT 2024 चा निकाल 20 डिसेंबर 2024 पर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे. गेल्या दोन वर्षांत CAT चा निकाल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच प्रसिद्ध झाला आहे. जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात CAT 2024 च्या अधिकृत घोषणेनंतरच निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
उमेदवार 2024 CAT निकालांची प्रतीक्षा करत असताना MBA प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी विद्यापीठांचा आता शोध घेताय. CAT 2024 परीक्षेनंतर विद्यार्थी सोडवलेल्या प्रश्नाच्या आधारावर गुणाचा अंदाज बांधत आहेत. कारण या आधारेच विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाविद्यालय किंवा विद्यापीठाची निवड करता येणार आहे.
CAT 2024 परीक्षा : यावर्षी CAT 2024 च्या परीक्षेसाठी सुमारे 3.29 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2.93 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 24 नोव्हेंबर 2024 रोजी 389 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. CAT 2024 परीक्षा पॅटर्न देखील बदलण्यात आला होता.
CAT 2024 निकाल कसा डाउनलोड करावा? :अधिकृत वेबसाइट विद्यार्थ्यांना CAT 2024 स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक देण्यात येणार आहे. विद्यार्थांना त्यांचा CAT निकाल पाहण्यासाठी तसंच गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी IIM CAT अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- पायरी 1 : IIM CAT च्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा
- पायरी 2 : IIM CAT 2024 स्कोअरकार्ड लिंक वर क्लिक करा.
- पायरी 3 : तुमचा परीक्षेचा आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- पायरी 4 : त्यानंतर तुमचं CAT स्कोअरकार्ड तुम्हाला दिसेल.
- पायरी 5 : CAT गुणपत्रिकेची PDF प्रत डाउनलोड करा.
हे वाचलंत का :
- OnePlus 11 चे नवीनतम OxygenOS 15 अपडेट सुरू, यूजर्सना मिळताय लेटेस्ट AI अपडेट्स
- 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह Realme Neo7 लाँच, जाणून घ्या किंमत..
- यूट्यूबनं आणलं ऑटो-डब फीचर, व्हिडिओ इतर भाषेत होणार डब