मुंबई : राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२५ साठी APAAR आयडी अनिवार्य नसल्याचं अधिसूचनेत म्हटलंय. १४ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या अलीकडील सार्वजनिक सूचनेचा संदर्भ देत उमेदवारांना त्यांचे आधार तपशील अपडेट करण्याचे आणि त्यांचे APAAR आयडी लिंक करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
NTA वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG 2025 घेणार आहे. मात्र, या परीक्षाच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाहीय. त्यातच १४ जानेवारी 2025 रोजी एनटीएनं नोंदणीपूर्वी उमेदवारांना आधार (AADHAR) आणि APAAR (APAAR) आयडींबाबत एक अधिसूचना जारी केली होती. ज्यामध्ये आधार कार्ड आणि आपर कार्ड एकमेकांना संलग्न विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यावर NTA नविन अधिसूचना जारी केलीय. ज्यामध्ये APAAR आयडी आधार कार्डला संलग्न करण्याचं अनिवार्य नसल्याचं म्हटलं आहे.
NEET UG 2025 नोंदणी प्रक्रियेसाठी APAAR आयडी अनिवार्य नाही. अर्जदार अजूनही पर्यायी पद्धतींद्वारे परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. - NTA
APAAR आयडी आणि आधारचे फायदे
APAAR आयडी आधारशी जोडल्यानं परीक्षा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित होते. यामुळं पडताळणीची टप्पे सोपे होतीलच, शिवाय परीक्षेची विश्वासार्हताही वाढेल. प्राथमिक ओळखपत्र म्हणून आधारचा वापर केल्यानं, परीक्षा अधिकारी उमेदवारांची योग्यरित्या ओळख पटवू शकतात, ज्यामुळं फसवणूक लक्षणीयरीत्या कमी होते.
तुमचं आधार कार्ड कसं अपडेट करावं
खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही myAadhaar पोर्टलवर तुमची ओळख, पुरावा, पत्ता आणि पत्ता कागदपत्रे मोफत अपडेट करू शकता.
- 1: myAadhaar पोर्टलवर जा.
- 2: एंटर पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि 'ओटीपी पाठवा' पर्यायावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मिळाल्यावर, तो एंटर करा आणि एंटर पर्यायावर क्लिक करा.
- 3: सूचना वाचल्यानंतर, पुढील पर्यायावर क्लिक करा.
- 4: ओळखपत्र आणि पत्ता पुराव्यासाठी कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट केले जाईल. त्यानंतर, तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड सात दिवसांच्या आत अपडेट केले जाईल.
हे वाचलंत का :