हैदराबाद CNG taxi, autorickshaw Fare Hike : मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरण (एमएमआरटीए) च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, ऑटोरिक्षांसाठी नवीन मूळ भाडे 23 रुपयांऐवजी 26 रुपये असेल, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी 28 रुपयांवरून भाडं 31 रुपये होणार आहे. एसी कूल कॅबचं भाडं पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी सध्याच्या 40 रुपयांऐवजी ४८ रुपयांपासून सुरू होईल. गुरुवारी झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
सुधारित दर सीएनजीवर लागू : सुधारित दर फक्त सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांसाठी लागू आहेत. एमएमआरमध्ये चालणाऱ्या बहुतेक टॅक्सी आणि ऑटोरिक्षा सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. मीटर रिकॅलिब्रेट केल्यानंतरच नवीन भाडे आकारता येईल, असं एमएमआरटीएच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रसिद्धीपत्रकातून महिती
9 मार्च 2020 पासून, महाराष्ट्र सरकारनं राज्यातील टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडे सुधारणांसाठी बी. सी. खटुआ समितीनं तयार केलेलं सूत्र स्वीकारलंय. 10 ऑक्टोबर 2016 रोजी ही समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीसाठी खटुआ समितीच्या सूत्राचा वापर करून, सुधारित भाडं वाढवण्यात येत आहे, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
टॅक्सी, ऑटोरिक्षांच्या भाड्यात सुधारणा
दोन वर्षांहून अधिक काळानंतर, परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरटीएनं एमएमआरमध्ये चालणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात सुधारणा केली आहे. मागील भाडं सुधारणा सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती. "भाडेवाढ फक्त नवीन दरांशी जुळवून घेतलेल्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांना लागू होईल," असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
1 फेब्रुवारी 2025 पासून दर लागू
या प्रसिद्धीपत्रकानुसार, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांना 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2025 या पुढील तीन महिन्यांत सुधारित भाड्यांसह त्यांचे वाहन मीटर रिकॅलिब्रेट करणं बंधनकारक असेल. मीटर रिकॅलिब्रेट होईपर्यंत, मागील भाडं शुल्क कार्ड 30 एप्रिलपर्यंत लागू राहील, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. काही नवीन शेअर्ड टॅक्सी आणि शेअर्ड ऑटो-रिक्षा स्टँडस्टँडोला बैठकीत मान्यता देण्यात आली, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
हे वाचलंत का :