हैदराबाद Borrowing from unauthorized apps :आजच्या ऑनलाइन युगात प्रत्येक गोष्ट बोटांवर उपलब्ध आहे. त्यामुळं समस्या देखील अनेक आहेत. तत्काळच्या गरजांसाठी मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडून कर्ज घेण्याऐवजी, आज बरेच लोक ऑनलाइन कर्ज घेतात. अधिकृत बँका आणि NBFC कडून कर्ज घेतल्यास कोणतीही अडचण येत नाही. पण, अनियंत्रित ॲप्सकडून हजार रुपये उधार घेणं देखील महागात पडू शकतं.
कर्ज प्रोसेसर कसं कार्य करतात? :तुम्ही बँक कर्जासाठी ऑनलाइन शोध घेतल्यास, अल्गोरिदमिक पद्धतीनं या कर्ज-संबंधित जाहिराती तुम्हाला दाखवल्या जातात. काहीवेळा तुम्ही इंटरनेटवर जे शेअर केले आहे, त्यावर आधारित तुमच्या मोबाइल नंबरवर जाहिराती येतात. या जाहिरातींमध्ये अधिकृत ॲप्स आणि अनधिकृत ॲप्सचा समावेश असू शकतो. आपण चुकीचं ॲप्स निवडल्यास काय होऊ शकतं हे अकल्पनीय आहे.
तुमची सर्व माहिती त्यांच्याकडं :तुम्ही अशी ॲप्स इन्स्टॉल करताच, ते वेगवेगळ्या परवानग्या मागतात. ते तुमचा फोनवर फोन नंबर, गॅलरी परवानगी, एसएमएस परवानगी, कॉल रेकॉर्ड परवानगी इ. विचारतात. तुम्ही सर्व परवानगी दिल्यास त्यांना तुमची सर्व माहिती मिळते.
असा होतो घोटाळा :उदाहरणार्थ समजा तुम्ही 5 हजार रुपये कर्ज घेतल्यास तुमच्या खात्यात प्रोसेसिंग फीसह विविध शुल्क वजा केलं जातं. त्यानंतर तुमच्या खात्यात 3,500 ते 4,000 रुपये जमा होतील. जास्तीत जास्त, कर्जाची परतफेड करण्यासाठी काही दिवसांचा अवधी देतील. या दिवसांमध्ये व्याज दररोज वाढेल. तुम्ही हप्ता भरला असेल तरीही तुम्हाला फोन करून त्रास दिला जाईल.
धमक्या : जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही, तर तुमच्या मोबाइल फोनवरून घेतलेल्या फोन नंबरवर अपमानास्पद संदेश पाठवणे. तुमचे मित्र, कार्यालयातील सहकारी, नातेवाईक यांना शेकडो संदेश पाठवले जातील. यामुळं तुमच्यावर दबाव येईल. तसंच गॅलरीतून काढलेली छायाचित्रे पाठवण्यासाठी धमक्या देण्याच्या घटना घडल्या आहेत.
काय करावं?: इतर कोणताही पर्याय नसताना तुम्ही या कर्जाच्या सापळ्यात अडकले, असाल तर घाबरू नका. प्रथम, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना परिस्थितीबद्दल सांगा. त्यानंतर भारत सरकारच्या सायबर क्राइम विभागाच्या https://cybercrime.gov.in/ या वेबसाइटवर तुमची तक्रारी नोंदवा. किंवा तुम्ही तुमच्या राज्यातील सायबर क्राईम पोलिसांकडं थेट तक्रार दाखल करू शकता.
काय करू नये? :घोटाळेबाजांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा पैसे पाठवू नका. मित्रांना कळलं, तर लाज वाटू घेऊ नका. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकते. तुमच्या मित्रांना अशाच समस्या येत, असतील तर त्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करा.
फसवणूक करणारे ॲप्स कसे शोधायचे?: फसवणूक करणारे ॲप्स शोधण्यासाठी केंद्र सरकार नवीन नियमांवर काम करत आहे. आधीच काही चिनी कर्ज देणारी ॲप्स ब्लॉक केली आहेत. हे ॲप्स आंतरराष्ट्रीय नेटवर्कसह कार्य करतात. भारतातील कॉल सेंटर्स प्रमाणे ते सेटअप आणि ऑपरेट केल्यामुळं धमक्या येतात. तुम्हाला अपरिचित असलेल्या आणि झटपट कर्ज देणाऱ्या उच्च व्याजदरांची मागणी असलेल्या कोणत्याही ॲपवरून कर्ज घेऊ नका.
RBI काय कारवाई करणार?: भारतातील आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी जबाबदार असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर उपाय शोधतेय. पहिल्या टप्प्यात, क्रेडिट ऍप्लिकेशन्सची माहिती असलेले एक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरबीआयचे संचालक शक्तीकांत दास यांनी ऑगस्टच्या वित्तीय धोरणात (द्वि-मासिक चलनविषयक धोरण) याचा उल्लेख केला.