वॉशिंग्टनBoeing Starliner return to Earth :बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन अवकाशात झेपवलं होतं. या मोहिमेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठवडाभर राहिल्यानंतर सुनीता विल्यम्ससह त्यांचे सहकारी बुच विल्मोर परतणार होते. मात्र, बोइंगची स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये बिघाड झाल्यानं त्यांना पृथ्वीवर परत आणण्यात अडचणी येत आहेत.
सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना दिलासा नाही : अंतराळात 12 आठवडे घालवल्यानंतर, बोइंगचं स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) मायदेशी परतण्यासाठी सज्ज झालं आहे. स्टारलाइनर अवकाशातून पृथ्वीवर परतणार असल्याचं नासानं म्हटलं आहे. मात्र, त्यात सुनीता विल्यम्स तसंच त्याचे सहकारी बुच विल्मोर परतणार नाहीय. बोईंग स्टारलाइनरनं 5 जून रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळात उड्डाण केलं होतं. ते एका आठवड्यात परतणार होते, पण स्पेसशिपमधील हेलियम लीक आणि थ्रस्टरमधील खराबीमुळं ते पृथ्वीवर परत येऊ शकले नाही. याबाबत नासानं आता माहिती दिलीय. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवरच राहावं लागणार आहे.