हैदराबाद :BMW नं भारतातील सर्वात लोकप्रिय परफॉर्मन्स सेडान M340i मध्ये एक अपडेट आणलं आहे. यात दिलेले अपडेट्स फार मोठे नसले, तरी त्यामुळं सेडान आणखी आकर्षक झाली आहे. त्यांच्या 3-मालिकेतील हा सर्वात शक्तिशाली प्रकार आहे. त्याचं मेकॅनिकल अपडेट्स सारखेच असून बाहेरील आणि आतील भागात काही बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया नवीन BMW M340i कोणत्या फीचर्ससह लॉंच करण्यात आलीय.
BMW M340i : BMW M340i मध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. यात नवीन जेट-ब्लॅक 19-इंच अलॉय व्हील्स आहेत. यामध्ये देण्यात आलेल्या हेडलाइट्समध्ये एल-आकाराचे घटक आणि तीक्ष्ण दिसणारे बंपर यांसारख्या शैली देण्यात आल्या आहेत, ज्यामुळ ही सेडान पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसतेय. कारचे रंग पॅलेट अपडेट केले आहेत. आता याला आर्क्टिक रेस ब्लू आणि फायर रेड या दोन नवीन शेडमध्ये आणण्यात आले आहे. इतर शेड्समध्ये द्राविट ग्रे आणि ब्लॅक सॅफायरचा समावेश आहे.
BMW M340i इंटीरियर : BMW M340i च्या इंटिरियरबद्दल बोलायचं झाले तर कारच्या डॅशबोर्ड डिझाइन आणि लेआउटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसंच, वैशिष्ट्ये देखील समान दिले आहेत. कंपनीनं आपली ऑपरेटिंग सिस्टम 8.0 ते 8.5 पर्यंत अपडेट केली आहे. याशिवाय अपडेटेड सिस्टमवर चालणारी 14.9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. BMW ने कॉन्ट्रास्टिंग M ब्लू स्टिचिंगसह वर्नास्का लेदर सीट्स देखील दिल्या आहेत. याच्या स्टिअरिंग व्हीलच्या डिझाइनमध्येही थोडासा बदल करण्यात आला आहे, मात्र त्याला तीन-स्पोक डिझाइन देण्यात आलं आहे.