हैदराबादBharat Mobility Expo 2025: भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चं उद्घाटन आज (शुक्रवार, 17 जानेवारी) होत आहे. हा एक्सपो दिल्लीतील तीन प्रमुख ठिकाणी होणार आहे. यात प्रगती मैदान, द्वारका आणि ग्रेटर नोएडाचा समावेश आहे. इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे आयोजित या मेगा इव्हेंटमध्ये भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी होताय.
मोदींच्या हस्ते मेगा इव्हेंटचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत मंडपम येथे या मेगा इव्हेंटचं उद्घाटन करतील. उद्घाटन समारंभानंतर, पहिला दिवस केवळ माध्यमांसाठी समर्पित असेल, तर दुसरा दिवस डीलर्ससाठी राखीव असेल. यानंतर, 19 ते 22 जानेवारी दरम्यान, हा एक्स्पो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला असेल. विशेष म्हणजे, या एक्स्पोमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, परंतु मोटर शोमध्ये भाग घोण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं अनिवार्य असेल. तुम्ही नोंदणीसाठी, http://www.bharat-mobility.com ला भेट द्यावी देऊन नोंदणी करू शकता.
आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग
हिरो मोटोकॉर्प आणि सुझुकी मोटरसायकल इंडिया सारख्या कंपन्या दुचाकी क्षेत्रात आघाडीची भूमिका बजावतील. त्याच वेळी, प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, किआ इंडिया, एमजी मोटर इंडिया आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया सारखे ब्रँड त्यांचे नवीन आणि अपग्रेड केलेले मॉडेल सादर करतील. लक्झरी कार सेगमेंटमध्ये, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू इंडी आणि पोर्श इंडिया सारखे आघाडीचे ब्रँड त्यांच्या आलिशान आणि प्रीमियम वाहनांचं प्रदर्शन करतील. त्याच वेळी, टाटा मोटर्स आणि व्हीई कमर्शियल व्हेईकल्स देखील व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये त्यांची मजबूत उपस्थिती दर्शवतील.