हैदराबाद : गेल्या वर्षी ॲपलनं त्यांच्या नवीनतम आयफोन 16 लाइनअपसह ॲपल इंटेलिजेंस फीचर्सची घोषणा केलीय, ज्याचा फायदा निवडक उपकरणांना होणार आहे. आता भारतात iOS 18.4 चं रोलआउट एप्रिलमध्ये होऊ शकतो. या अपडेटमुळं आयफोन वापरकर्त्यांना विशेष वैशिष्ट्यांचा फायदा मिळेल. नवीन अपडेटनंतर, सिरीला अधिक चांगल्या कमांड देता येतील.
भारतीय वापरकर्त्यांना त्यांची भाषा यूएस इंग्रजी किंवा कॅनेडियन इंग्रजीमध्ये सेट करून ॲपल इंटेलिजन्सचा फायदा मिळत आहे. याशिवाय, सध्या फक्त ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूकेमध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांनाच अॅपल इंटेलिजेंसवर प्रवेश दिला जातोय. ही वैशिष्ट्ये एप्रिल महिन्यात भारतात आणली जाऊ शकतात. कंपनीनं स्वतः याबाबत पुष्टी दिली आहे. नवीन अपडेटमध्ये उपलब्ध असलेल्या ५ वैशिष्ट्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया...
एआय-चालित सिरी
अपडेटनंतर, वापरकर्त्यांना सिरीमध्ये सर्वात मोठा बदल दिसून येईल. व्हर्च्युअल असिस्टंट पूर्वीपेक्षा अधिक कामं फक्त बोलून करता येतील. वापरकर्त्यांना सिरीशी संबंधित सूचना देखील दिल्या जातील.
व्हॉइस असिस्टंट
व्हॉइस असिस्टंट आता तुमच्या गोष्टी लक्षात ठेवेल आणि मागील गोष्टींवर आधारित नवीन सूचना देईल. याचा अर्थ असा की तुम्ही सिरीला स्वतःबद्दल विचारू शकता आणि तुम्हाला ईमेलपासून पासपोर्ट क्रमांकापर्यंत सर्व माहिती दिली जाईल. तुम्ही एकमेकांशी संबंधित अनेक प्रश्न सतत विचारू शकता. जसे की, 'हे सिरी, मुंबईतील हवामान कसं आहे?' यानंतर 'वाहतूक कशी आहे?' विचारल्यानंतर, तुम्हाला मुंबईतील नवीनतम वाहतूक स्थिती सांगितली जाईल.