हैदराबाद Apple first foldable iPhone : फोल्ड स्मार्टफोन मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्थिर वाढ झालीय. ज्यामध्ये Samsung, Huawei आणि Motorola सारख्या प्रमुख कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन बाजारात उतरवले आहेत. विशेषतः, सॅमसंगची Galaxy Z सीरीज बाजारपेठेत धुमाकूळ घालतेय. या सीरीजला ग्राहकांची मोठी पसंती मिळतेय. त्यामुळं कंपनी प्रत्येक सीरीजमध्ये नवीन सुधारित डिझाइनसह नविन फीचर आणत आहे.
2026 पर्यंत लॉंच होण्याची शक्यता : तुम्हीही ॲपलच्या फोल्डेबल आयफोनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका नवीन अहवालात Apple चा फोल्डेबल फोन 2026 पर्यंत लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ॲपल कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाहीय.
Apple चा फोल्डेबल स्मार्टफोन :ॲपल कंपनी फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये उत्तम फीचर देखील आणण्याची शक्यता आहे. ॲपल कंपनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. तसंत त्यांच्या फोनचं सुरक्षा फीचर देखील अप्रतिम आहे. यामुळं कपनीच्या फोनला भारतात उत्तम मागणी आहे. अलीकडंच कंपनीनं भारतात Apple फोनचं उत्पादन करण्याची घोषणा केली होती. तसंच भारतीय ग्राहकांची मागणी पाहता त्यांनी कंपनीचे आउटलेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Apple फोल्डेबल आयफोन कसा असेल याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे. हा फोन इतरांपेक्षा अनोखा असेल, या फोल्डेबल फोनमुळं बाजारात स्पर्धा निर्माण होइल.