महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

2025 Tata Nexon नवीन प्रकार आणि रंगांसह लाँच, जुन्या किमतीत अधिक वैशिष्ट्य, जाणून घ्या किंमत... - 2025 TATA NEXON LAUNCHED

2025 Tata Nexon मॉडेल लाँच झालंय. या नवीन मॉडेलमध्ये, कंपनीनं रंग पॅलेट बदलला आहे. कंपनीनं नेक्सनच्या ट्रिम लाइनअपमध्ये देखील बदल केला आहे.

2025 Tata Nexon
2025 Tata Nexon (Tata)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 11, 2025, 10:27 AM IST

हैदराबाद :टाटा मोटर्सचं 2025 Tata Nexon लाँच झालं आहे. या नवीन मॉडेलमध्ये, कंपनीनं बदल केले आहेत. या कारमध्ये तुम्हाला आता नविन रंग पॅलेट पहायला मिळेल. नेक्सनमध्ये ग्रासलँड बेज आणि रॉयल ब्लू हे दोन नवीन रंग समाविष्ट केले आहेत. विशेष म्हणजे टाटा मोटर्सनं 2025 नेक्सनच्या रंग पॅलेटमधून फ्लेम रेड आणि पर्पल शेड्स बंद केले आहेत. मार्केटिंग मटेरियलमध्ये टाटा ग्रासलँड बेजचा हायलाइट रंग म्हणून वापर करत आहे. कंपनीनं प्युअर ग्रे, डेटोना ग्रे, कॅलगरी व्हाइट आणि ओशन ब्लू सारखं इतर रंग यात कायम ठेवले आहेत.

किती आहे किंमत
कंपनीनं ट्रिम लाइनअपमध्ये देखील बदल केला आहे. वाढीव वैशिष्ट्यांसह व्हेरिएंट व्हेरिएंट म्हणजे NTS, ज्यामध्ये स्मार्ट+ आणि फियरलेस+ PS व्हेरिएंट डिटेल्स आहेत. स्मार्ट ट्रिम काही काळापूर्वी बंद करण्यात आली होती. आता, ती पुन्हा लाँच करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने नेक्सॉननं लाइनअपमधून अनेक व्हेरिएंट काढून टाकलं आहेत, ज्यामुळे त्याची संख्या 52 वर आली आहे. 2025 टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत अजूनही 7.99 लाख रुपये आहे.

2025 Tata Nexon स्मार्ट प्लस व्हेरिएंट डिटेल्स
स्मार्ट+ ट्रिममध्ये व्हील कॅप्स जोडण्यात आल्या आहेत. प्युअर+ ट्रिमसह, टाटा चांगले वैशिष्ट्ये यात देतेय. आता त्यात बॉडी-कलर आउटसाइड डोअर हँडल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 10.2-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर-व्ह्यू कॅमेरा आणि ऑटो-फोल्ड ORVM समाविष्ट आहेत.

2025 Tata Nexon क्रिएटिव्ह व्हेरियंटची माहिती
क्रिएटिव्ह ट्रिममध्ये अनेक वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहेत. मुख्य अॅड-ऑन्समध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 10.2 -इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि पुश-बटण स्टार्ट यांचा समावेश आहे. टॉप-स्पेक फियरलेस +पीएस ट्रिममध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आहे.

2025 Tata Nexon क्रिएटिव्ह प्लस
कंपनीनं क्रिएटिव्ह+ पीएस देखील अपडेट केली आहे. क्रिएटिव्ह+ ट्रिममध्ये आता पीएस आहे, म्हणजेच त्याला पॅनोरॅमिक सनरूफ आहे. क्रिएटिव्ह+ पीएस ट्रिममध्ये वायरलेस चार्जर, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लॅम्प, मागील ऑक्युपंट डिटेक्शनसह ६०:४० स्प्लिट रीअर बेंच सीट्स आणि मागील डिफॉगर समाविष्ट आहे.

हे वाचलंत का :

  1. स्कोडाची नवीन Enyaq जागतीक स्तरावर सादर, जाणून घ्या कधी होणार लॉंच?
  2. शाओमी पॅड 7 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमतसह वैशिष्ट्ये
  3. टाटा मोटर्सनं केल्या तीन नविन कार लॉंच, किंमत पाच लाखांपेक्षा कमी, जाणून घ्या फीचरसह किंमत

ABOUT THE AUTHOR

...view details