महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात वृद्धला 13.26 कोटींचा चुना, तीघांना अटक - Cyber ​​fraud

Cyber ​​fraud : एका वृद्ध व्यक्तीची सायबर फसवणूक प्रकरणात 13.26 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे.

CYBER ​​FRAUD
सायबर फसवणूक प्रकरण (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 5, 2024, 4:19 PM IST

हैदराबाद Cyber ​​fraud :देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक प्रकरणात एका वृद्ध व्यक्तीला 13.26 कोटींचा फटका बसलाय. सायबर गुन्हेगारांनी या वृद्धाची फसवणूक करत 13.26 कोटी हडप केले. काही दिवसापूर्वी झालेल्या घोटाळ्यासी याचा संबंध आहे. या आगोदर हैदराबादमधील एकाला 8.6 कोटींचा चुना लावल्या प्रकरणी तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरो (TGCSB) ने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे.

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग टिप्स ऑफर :ताज्या घटनेत हैदराबादमधील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ज्याला व्हॉट्सॲपवर ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग टिप्स ऑफर करणारा मेसेज आला होता. यापूर्वी शेअर बाजारातून नफा कमावलेल्या वृद्धानं मेसेजला प्रतिसाद दिला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी AFSL, Upstox आणि International Brokers (IB) सारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या नावानं लिंक पाठवून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं.

शेअर बाजारात गुंतवणूक :या कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून घोटाळेबाजांनी शेअर बाजारात वृद्ध व्यक्तीला गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. सुरुवातीला, कमी नफा मिळणार असल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळं त्यांचा यावर विश्वास बसला. नंतर गुन्हेगारांनी त्यांना पैसे काढण्याची परवानगी दिलीय. त्यामुळं वृद्ध व्यक्तीनं एकाच वेळी 13.26 कोटी रुपय त्यानं दिले. मात्र, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना नंतर प्रतिसाद देणं बंद केलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वृद्ध व्यक्तीनं 2 सप्टेंबर रोजी TGCSB कडं तक्रार दाखलं केली.

अटक, चौकशी सुरू : तपासादरम्यान, TGCSB ला आढळून आलं की, काही पैसे हिमायतनगर येथील हैदराबाद मेट्रो रेल्वे कर्मचारी मोहम्मद अथिरपाशा (25) यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर, पोलिसांनी इतर दोन व्यक्तींचा सहभाग उघड केला. अराफत खालेद मोहिउद्दीन (25) हिमायतनगर तसंच सय्यद खाजा हाशिमुद्दीन (24) चारमिनार फते दरवाजा, अशी इतर दोन जणांची नावं आहेत. या दोघांनी मोहम्मद अथिरपाशाच्या नावावर बँक खातं उघडल्याचं कबूर केलं. अथिरपाशाच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपीनं क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासंदर्भात त्यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधला होता. जिथं त्यांनी एख खातं खोलण्याची विनंती केली होती. त्यानंतर अथिरपाशाच्या खात्यातील पैसे काढून क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले गेले. मात्र, यातील मुख्य सुत्रधाराची ओळख पटलेली नाहीय. या प्रकरणात तिघांना बुधवारी अटक करून कोठडी सुनावण्यात आली. सायबर फसवणुकीमागील सूत्रधार शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

हे वाचलंत का :

अनधिकृत ॲप्सकडून घेतलेलं कर्ज पडतंय महागात? अशी करा कर्जातून सुटका - Borrowing from unauthorized apps

ABOUT THE AUTHOR

...view details