महाराष्ट्र

maharashtra

इलेक्ट्रिक वाहनावर 10 हजारांची सूट, 'ही' आहे शेवटची तारीख - Discount on Electric Scooters

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 31, 2024, 4:41 PM IST

जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायची असेल, तर सप्टेंबर महिना तुमच्यासाठी योग्य असेल. कारण केंद्र सरकारनं निवडक इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीवर 10 हजार रुपयांची सूट देण्याची योजना यावर्षी मार्चमध्ये सुरू केली होती. ही योजना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू आहे.

Electric Scooters
चेतक स्कूटर (Etv Bharat MH Desk)

हैदराबाद :केंद्र सरकार दीर्घ काळापासून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. यासाठी, सरकारनं विविध योजना देखील चालवल्या आहेत. त्यापैकी सर्वात परिचित योजना म्हणजे FAME-II योजना. परंतु अवजड उद्योग मंत्रालयानं यावर्षी मार्चच्या अखेरीस इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशनसाठी दुसरी योजना सुरू केली होती. ज्याचं नाव इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) आहे.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरवर ((फोटो - Bajaj Auto))

10 हजार रुपयांची सबसिडी :या योजनेअंतर्गत निवडक इलेक्ट्रिक दुचाकींच्या एक्स-शोरूम किमतीवर 10 हजार रुपयांची सबसिडी दिली जातेय. केंद्र सरकारकडून हे अनुदान ग्राहकांना मिळतंय. ही योजना सरकारनं 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या योजनेचा कालावधी सप्टेंबर महिन्यात संपत आहे.

टीवीएस आईक्यूब ((फोटो - TVS Motor))

या गाड्यावंर मिळणार सवलत : सरकारनं या योजनेच्या विस्ताराबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. त्यामुळं, जर तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर अतिरिक्त सवलत मिळवू शकता. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन योजनेंतर्गत सध्या विक्री असलेल्या काही प्रीमियम इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये Ather 450X, Ather Rizta, Ola S1 Pro, TVS iQube, Bajaj Chetak आणि Vida V1 यांचा समावेश आहे.

एथर रित्जा ((फोटो - Ather Energy))

इलेक्ट्रिक दुचाकींसाठी 778 कोटी :EMPS चा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक दुचाकींसाठी 778 कोटी रुपयांचं बजेट दिलं होतं. यामध्ये 5,00, 080 EV चा समावेश आहे. ही रक्कम संभाव्य ईव्ही खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा देत असली तरी, अवजड उद्योग मंत्रालय त्याचा विस्तार करणार की नवीन योजना आणणार हे पाहणं बाकी आहे.

विदा वी1 प्रो ((फोटो - Hero Vida))

'हे' वाचलंत का :

  1. भारत एनसीएपी क्यूआर कोड लाँच : कारच्या सुरक्षेबद्दल मिळणार सर्व माहिती - Bharat NCAP QR Code Launched
  2. जगातील पहिली CNG दुचाकी लॉंच, सीएनजीसह पेट्रोलची सुविधा, दुचाकीचं बुकींग सुरू - WORLD FIRST CNG BIKE

ABOUT THE AUTHOR

...view details