महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस महिलेनं आधी मित्राला केला फोन अन् मग मारली इंद्रायणी नदीत उडी; शोधमोहीम सुरू - Woman Police Jump In Indrayani - WOMAN POLICE JUMP IN INDRAYANI

Woman Police Jump In Indrayani : पोलीस महिलेनं इंद्रायणी नदीत उडी मारल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या पोलीस महिलेनं मित्राला फोन करुन आपण आत्महत्या करत असल्याचं सांगून नदीत उडी मारली. घटना घडल्यानंतर या पोलीस महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

Woman Police Jump In Indrayani
इंद्रायणी नदी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 2:59 PM IST

Updated : Aug 27, 2024, 6:37 AM IST

पुणे Woman Police Jump In Indrayani :आळंदीतील इंद्रायणी नदीत थेट महिला पोलिसानंच उडी मारल्यानं मोठी खळबळ उडाली. महिला पोलीस शिपायानं नदीत उडी मारल्याची घटना पाहून एका तरुणानं त्या महिला पोलिसाला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र तो अपयशी ठरला. आता पोलीस आणि बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे. अनुष्का सुहास केदार ( वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी ) असं आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचं नाव आहे.

मित्राला फोन करुन मी आत्महत्या करत असल्याची दिली माहिती :अनुष्का सुहास केदार या पुणे ग्रामीणच्या मुख्यालयात कार्यरत आहेत. पण गेली दोन दिवस त्या कर्तव्यावर नव्हत्या. अशातच आळंदी लगतच्या वडमुखवाडीतील घरातून त्या आज सायंकाळी चारच्या सुमारास बाहेर पडल्या अन त्यांनी थेट इंद्रायणी नदीचा पूल गाठला. त्याच पुलावर उभं राहून एका मित्राला फोन लावला, अन् मी आत्महत्या करत असल्याचं सांगून थेट नदीत उडी घेतली. हे एका तरुणानं पाहिलं अन् त्यानं जीवाची पर्वा न करता त्याच वाहत्या प्रवाहात उडी घेतली. वाहून जाणाऱ्या महिला पोलिसाला वाचवण्याचा त्या तरुणानं सर्वोतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. आता आळंदी पोलीस आणि बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे. दुसरीकडं आळंदी पोलिसांनी कुटुंबीयांकडून माहिती घेतली असता वैयक्तिक कारणांमुळे महिला पोलिसानं हे पाऊल उचल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं.

महिला पोलीस शिपायाचा शोध सुरू :आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनुष्का सुहास केदार (वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय इथं नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरुन नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. आज सकाळपर्यंत आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल, NDRF पथक, पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक या सर्वांच्या सहकार्यानं शोधकार्य सुरु आहे. पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे बोट घेऊन पाण्यात उतरण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. अद्याप नदीच्या मध्यभागी न पाहता नदीकिनारी शोधकार्य चालू आहे."

हेही वाचा :

  1. पुण्यात पुन्हा 'कोयत्या'ची दहशत; सहायक पोलीस निरीक्षकावर भरदिवसा हल्ला - Koyta Gang Attack On Police Officer
Last Updated : Aug 27, 2024, 6:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details