विरार Virar murder case :विरारमध्ये पेट्रोल पंप मालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंप मालक रामचंद्र काकरानी (वय 75) यांची हत्या झाली आहे. सोमवारी त्यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला.
नेमंक प्रकरण काय ? : याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी नेहमीप्रमाणे रामचंद्र काकराणी आपल्या खाजगी कारमधुन चालकासोबत विरार येथील पेट्रोल पंपावर आले होते. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून 50 हजार रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले. रात्री घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांची वाटेतच हत्या केली. मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ सोडून पळ काढला.
- सोमवारी दुपारी स्थानिक नागरिकांना कारमध्ये बांधलेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता गळा आवळून त्यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. पोलीस अधिक तपास केला जात आहे.