महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात ट्रकच्या धडकेत दोन तरुणी ठार, एक चिमुकला जखमी : घटना सीसीटीव्हीत कैद - Accident in Jalgaon

Accident in Jalgaon - जळगावमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन तरुणांची जागीच मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे.

जळगावात ट्रकच्या धडकेत दोन तरुणी ठार
जळगावात ट्रकच्या धडकेत दोन तरुणी ठार, अपघाताचे घटनास्थळ (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 2:20 PM IST

Updated : Aug 29, 2024, 2:26 PM IST

जळगावAccident in Jalgaon:जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. शहरातील महामार्गावरील मानराज पार्क ते गुजराल पेट्रोल पंपादरम्यान भीषण अपघातात एका ट्रकच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारी दीड वाजता घडली आहे. जखमी चिमुकला एक वर्षाचा असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.



घटनास्थळी मोठा जमाव जमला -जळगाव शहरातून जाणारा महामार्ग खड्डेमय झाला आहे. तसंच ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात नेहमी लहान-मोठे अपघात होत आहेत. आज घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की, दोन तरुणींसह एक चिमुकला दुपारी १.५० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच.१८.एएस.५३७९ ने खोटेनगर स्टॉपकडून उड्डाण पुलाने मानराज पार्ककडे जात होते. उड्डाणपूल उतरताच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघात इतका भयावह होता की दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला . तर चिमुकला जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.


यादरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलीस पोहचले आहेत. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला आहे. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, माजी महापौर जयश्री महाजन या एका कार्यक्रमानिमित्त द्वारकानगरकडे जात असताना त्यांना महामार्गावर गर्दी दिसली. त्यांनी आपलं वाहन थांबवलं आणि काय झालंय? अशी विचारपूस केली. अपघात झाल्याचं कळताच माजी महापौर या मयतांच्या नातेवाईकांना घेऊन बाळ उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णालयात रवाना झाल्या. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलीसही पोहचले. माजी नगरसेवक अमर जैन देखील मदतकार्य करीत आहेत.


या अपघातातील दोन तरुणींचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. यातील चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Last Updated : Aug 29, 2024, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details