महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मासे पकडायला गेले अन्...'; दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी

Dam Collapses in Raigad : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्या जवळील धुतुम गावाजवळ धरण कोसळल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तर दोघे जखमी झाले आहेत.

Dam Collapses in Raigad
धरण कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 6:26 AM IST

Updated : Feb 27, 2024, 7:02 AM IST

रायगड Dam Collapses in Raigad :रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्या जवळील धुतुम गावाजवळ धरण कोसळल्यानं चार मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील उरणजवळ धरण कोसळल्यानं चार मुले ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर उर्वरित दोघांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळं मृत्यू झाला आहे.- सतीश निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

४० ते ५० वर्ष जुना पूल कोसळला: मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यात शेतात जाण्यासाठी जुना पूल बांधण्यात आला होता. या पुलाला ४० ते ५० वर्ष झाली होती. आदिवासी भागातील चार मुले खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती. यात दोन मुलांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश सुरेश मिरकुटे आणि राजेश लक्ष्मण वाघमारे अशी मृतांची नावे आहेत. तर गुरु सदानंद कातकरी आणि सुरज श्याम कातकरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मच्छी पकडताना घडली घटना: आदिवासी वाड्यातील चारही मुले खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती. मात्र खाडी किनाऱ्यावरील पूल कोसळल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिकांच्या मदतीनं अडकलेल्या चारही मुलांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोघांवर सध्या कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी उरण गुन्हे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे तसेच त्यांचे पथक दाखल झाले आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Feb 27, 2024, 7:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details