नाशिकNashik Bilwatirtha Incident:त्र्यंबकेश्वर येथील निलपर्वतामागील पायथ्याशी बिल्व तिर्थावरील तलाव आहे. या ठिकाणी परिसरातील तनुजा कोरडे आणि अर्चना धनगर या तेरा वर्षीय मैत्रीणी कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मुली तलावात बुडाल्या ही घटना अर्धा तासांनी कळल्यानंतर ग्रामस्थांनी दोघींना पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची पाण्यासाठी वणवण :त्र्यंबक नगरपरिषदेकडून शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिक पिण्यासाठी जार विकत घेतात. मात्र, वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मिळेल तेथून पाणी आणत असतात. कपडे धुण्यासाठी बिल्वतीर्थ तलावावर जातात. हा तलाव देवस्थान ट्रस्ट मालकीचा असून, काही वर्षांपूर्वी गाळ काढला तेव्हा काही ठिकाणी तो जास्त खोल करण्यात आला आहे. या आधी त्यात बापलेकांचा जीव गेला होता. देवस्थान ट्रस्टने तलावाभोवती संरक्षक भिंत बांधावी आणि सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे.
औरंगाबादमध्येही अशीच दुर्घटना : औरंगाबादमध्ये 31 ऑगस्ट, 2024 रोजी तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील सलैया पोलीस स्टेशन हद्दीतील सोनारचक गावात ही घटना घडली होती. तलावात आंघोळ करताना हा अपघात झाला होता. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला होता.