महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवनेरी जवळ पर्यटकांवर मध माशांचा हल्ला; ७० पर्यटक जखमी

Bee Attack In Pune : शिवजयंतीच्या सोहळ्या सुरु व्हायला काही वेळ असताना काही वेळ आधी पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना जुन्नर तालुक्यात घडलीय. यात जवळपास ७० पर्यटक जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bee Attack In Pune
मधमाशांच्या हल्ल्यात ७० पर्यटक जखमी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 2:49 PM IST

मधमाशांच्या हल्ल्यात ७० पर्यटक जखमी

पुणे Bee Attack In Pune : जुन्नर तालुक्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात 70 पर्यटक जखमी झाल्याची घटना घडलीय. ही घटना शिवजयंतीच्या (shiv jayanti 2024) एक दिवस अगोदर म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी शिवनेरीजवळ असलेल्या तुळजा लेणी जवळ घडलीय. काही अतिउत्साही पर्यटकांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला. त्यामुळं मधमाश्यांचे पोळे उठले आणि तेथे हजर असलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांने हल्ला चढवला. मधमाश्यांनी डंख मारल्यानं 70 जण जखमी झालेत. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मधमाश्यांच्या पोळ्यावर मारला दगड : पुणे आणि मुंबईतीन काही पर्यटक जुन्नर तालुक्यात सहलीसाठी आले होते. त्यातील काही तरुणांनी तेथे असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला. त्यामुळं ही घटना घडली. बुद्ध लेण्या मुक्त आंदोलन समिती पुणे यांच्या वतीनं बुद्ध सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनाचा पुरातत्व विभाग बुद्ध लेण्याकडं दुर्लक्ष करत असल्यामुळं तेथील लेण्यांची साफसफाई करण्यासाठी तसेच तेथील माहिती जाणून घेण्यासाठी पुणे येथून बुद्ध सहल आयोजित करण्यात आली होती. जुन्नरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेण्या असल्यानं येथे परदेशातून बौद्ध भिक्खू आणि पर्यटक नेहमी येत असतात.

लोकांनी सावधगिरी बाळगावी: ग्रामीण भागात मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जेव्हा माणसापासून धोका असल्याची जाणीव होते, तेव्हाच मधमाशा त्याच्यावर हल्ला करतात. मधमाश्यांचे हल्ले टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी. मधमाश्यांच्या पोळ्यांना इजा पोहोचू देवू नये. तसेच हल्ला झाल्यास लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

शिवनेरीवर शिवभक्तांची मोठी गर्दी: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी जयंती आहे. यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय सोहळा पार पडला. किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमला.

हेही वाचा -

  1. Bee Attack In lohare : रक्षा विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ला; २५ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
  2. मधमाशांच्या हल्ल्यात 16 जण जखमी; परभणीच्या पूर्णा तालुक्यातील घटना
  3. Man Killed in Bee Attack : तेलंगणामध्ये मधमाशांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, 10 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details