ठाणे Beats Child In Daycare Center : पाळणाघरामध्ये चिमुकल्यांना ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील हॅप्पी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर संतप्त पालकांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
चिमुकल्यांना बाधून मारहाण :डोंबिवली पूर्वेत राहणारं दाम्पत्य कामावर जातात. त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ते ठेवतात. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवते. त्यामुळे मुलीला सांभाळण्यासाठी हे दाम्पत्य गणेश प्रभुणे आणि त्यांच्या पत्नाला साडेआठ हजार रुपये रक्कम देतात. गणेश प्रभुणे त्यांची पत्नी आरती प्रभुणे आणि राधा नाखरे हे तिघं लहान मुलांचा सांभाळ करतात. या दाम्पत्यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवली जातात. प्रभुणे दाम्पत्य आणि राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवलं जात होतं. त्याला मारहाण केली जात होती.
संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद :डोंबिवलीतील या पाळणाघरात साधना सामंत ही कामगार महिला काम करण्यास गेल्यानंतर त्यांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला. तिनं हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला. तिनं सुरुवातीला विरोध केला. मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते. अखेर सामंत यांनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ कविता गावंड यांना देत घटनेची माहिती दिली. कविता गावंड यांनी पीडित पालकांना ही बाब सांगत रामनगर पोलीस ठाणं गाठलं.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केली टाळाटाळ :चिमुकल्यांना मारहाण केल्यानंतर पीडित पालकांनी पोलीस ठाणे गाठलं. मात्र अगोदर पोलिसांनी चाईल्डलाईन विभागात तक्रार दाखल करण्यास सांगून टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला. मात्र घटनेची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांना देण्यात आली. सुनिल कुऱ्हाडे यांनी तत्काळ तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यात दिले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
- धक्कादायक; नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलावर नराधमाचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
- Child Abuse Crime Maharashtra बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; आकडेवारी जाणून तुम्हालाही बसेल धक्का
- POCSO offence चिमुकल्यांच्या खासगी भागांना स्पर्श केला तरी POCSO गुन्हा होईल, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण