ठाणे Three Youth Drowing Barvi River : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी कुळगाव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हृतिकेश मुरगु ( वय 23), सुहास कांबळे (वय 19), युवराज हुली (वय 18) असं मृत तरुणांची नावं असून तिघंही अंबरनाथ शहारतील रहिवासी होते.
एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले : मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हृतिकेश, सुहास, युवराज हे तिघं मित्र अंबरनाथ शहरातील घाडगेनगर तसंच जावसई परिसरात राहणारे होते. हे तिघंही आपल्या काही मित्रांसह 1 मे ला दुपारच्या सुमारास बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळील बारवी नदीत पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळं एक मित्र बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला. दोघांनाही बुडताना पाहून तिसरा त्यांना वाचवण्यासाठी गेला. पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघंही नदीमध्ये बुडाले.