ETV Bharat / state

संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा, मनोज जरांगेंसह राजकीय नेते होणार सहभागी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा निषेधार्थ करण्याकरिता पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राजकीय पक्षांचे नेत्यांसह देशमुख कुटुंबाचे सदस्यदेखील सहभागी होणार आहेत.

Santosh Deshmukh murder case updates
Santosh Deshmukh murder case updates (संतोष देशमुख हत्या प्रकरण)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 10:45 AM IST

पुणे- सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

लाल महाल येथून आज सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

शनिवारी तीन आरोपींना अटक-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोन फरार आरोपींसह तिघांना पोलिसांनी शनिवारी पुणे आणि कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सात जणांना अटक आली आहे. फरार आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (26) आणि सुधीर सांगळे (23) यांना पुण्यातून उचलण्यात आले. सिद्धार्थ सोनवणे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे ठेवण्यात आले होते. पोलिसांनी न्यायालयात सांगितले, तीनही आरोपी कंपनीकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी होते. पैसे उकळण्याच्या एका संघटित रॅकेटचा भाग होते. मस्साजोग गावातील रहिवासी असलेल्या सोनवणेनं संतोष देशमुख यांच्या हालचालींवर नजर ठेवत आरोपींना माहिती दिली.

एक आरोपी फरार- आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण आणि छळ करून निघृण हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकल्प चालविणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची हत्या झाली होती. पोलिसांनी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात अटक केली.

  • सरपंच हत्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी डॉ. संभाजी वायभासे याची चौकशी केली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना पुण्यातून अटक केली. पोलिसांनी वायभासे याला नांदेड येथून ताब्यात घेत सीआयडीकडे सोपविलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.