महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थीनीचं रस्त्यावरुन रिक्षातून अपहरण करत ॲसिड हल्ल्याची धमकी; तरुण फरार - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Thane Crime News : डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचं भर रस्त्यावरुन रिक्षातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तसंच अपहरण करत पीडितेला जबर मारहाण करुन 28 वर्षीय आरोपी ॲसिड हल्ल्याची धमकी देत घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

Thane Crime News
प्रतिकात्मक छायाचित्र (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 10:49 PM IST

ठाणे Thane Crime News : डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचं भर रस्त्यावरुन रिक्षातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपहरण करत पीडितेला जबर मारहाण करुन 28 वर्षीय आरोपी ॲसिड हल्ल्याची धमकी देत घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. नितीन रवींद्र गायकवाड असं फरार आरोपीचं नाव आहे.

नेमकं काय घडलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी, देसाईनाका भागातील एका मोठ्या गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहते. ती डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्यातच 20 जुलै रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता पीडित एमआयडीसीतील विको नाका इथं बसनं उतरुन पायी चालत महाविद्यालयाकडे चालली होती. त्यावेळी या रस्त्यावरील स्नेह बंगल्यासमोरुन जात असताना आरोपी नितीन स्वतः रिक्षा चालवत या पीडित तरुणीच्या पाठीमागे आला. त्याच्या रिक्षेत कोणीही नव्हतं. त्यानं जबरदस्तीनं अल्पवयीन विद्यार्थीनीला आपल्या रिक्षेत बसण्यास भाग पाडलं. मात्र तिनं नकार देताच आरोपीनं जबरदस्ती रिक्षात बसवून रिक्षा सुसाट वेगानं कावेरी चौकातून पुढं एका झाडाखाली उभी केली. त्यानंतर त्यानं रिक्षा बंद केली आणि तो मागच्या आसनावर बसलेल्या अल्पवयीन विद्यार्थीजवळ आला.

तरुणीला धमकी : यानंतर रिक्षात पीडित तरुणीची मान मुठीत जोरानं पकडून तिचे हात पकडून रिक्षात जबर मारहाण करत 'तू कुठं जातेस, तू कोणाशी बोलतेस, माझ्याशी संपर्क का ठेवत नाहीस, माझ्याशी बोलत जा, भेटत जा' अशी धमकी दिली. मात्र यावेळी मला तुझ्याशी बोलायचं नाही असं पीडित तरुणीनं आरोपीला सांगताच तो चवताळला. त्यानं पीडित तरुणीला पुन्हा धमकी दिली की फक्त माझ्याशी संपर्क ठेऊन नकोस बघ, मग तू तुझं महाविद्यालयीन शिक्षण कसं पूर्ण करते तेच मी बघतो. तू माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर तुझ्यावर ॲसिड फेकून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच्या मारहाण आणि धमकीमुळं पीडित घाबरुन कशीबशी घरी पोहचली तर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल : दरम्यान, पीडितेनं घरी गेल्यावर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी 20 जुलै रोजी मानपाडा पोलीस ठाणे गाठून पीडितेवर घडलेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. दुसरीकडे डोंबिवली, कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्थाचा निर्माण झाला असून अशा घटना वारंवार घडत असल्यानं असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात तपास अधीकारी, पोलीस उपनिरीक्षक एस. पी. काळदाते यांच्याशी संपर्क साधला असता, सीसीटीव्ही फुटेज आणि त्रांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं सांगत आरोपी पकडल्यानंतर अधिक माहिती पोलीस तपासात समोर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मोहरमच्या मिरवणुकीतून रुग्णवाहिकेला दिली वाट, पोलिसांना संशय येताच 'त्या' प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल - MUMBAI CRIME NEWS
  2. तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर तर होत नाही? 441 बनावट सिमकार्ड विकणाऱ्या गुजरातच्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक - Mumbai Crime News

ABOUT THE AUTHOR

...view details