महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"पंतप्रधान तर सोडा गृहमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ न शकल्यानेचं शरद पवारांची..." - Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar : "माझ्यावर टीका करणारे गुजरातमध्ये तडीपार होते", या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. याला महाराष्ट्राचे वनमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरातून प्रत्युत्तर दिलयं. "शरद पवार हे पंतप्रधान तर सोडा देशाचे गृहमंत्रीसुद्धा बनू शकले नाही. त्यांचं दुःख आणि वेदना शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात", असं ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar
शरद पवार आणि सुधीर मुनगंटीवार (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 8:22 PM IST

नागपूर Sudhir Mungantiwar:केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर पुणे दौऱ्यावर असताना जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "माझ्यावर टीका करणारे गुजरातमध्ये तडीपार होते", या शब्दात शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत. ज्यावेळी जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याकरिता मदत करत नाही, त्यांच्या स्वप्नाला तडीपार करते, पंतप्रधान तर सोडा देशाचे गृहमंत्रीसुद्धा बनू शकले नाही, त्यांचे दुःख आणि वेदना शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात, अशा शब्दात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार (Etv Bharat Reporter)

'ही' तर नैतिक अधपतनाची सुरुवात :केवळ ७ खासदाराच्या भरोशावर आपण कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे नेते होण्याचे प्रयत्न करत होतो; पण यश मिळत नाही त्यावेळी असं वक्तव्य करणं म्हणजे नैतिक अधपतनाची सुरुवात झाल्याची लक्षणं असल्याचंसुद्धा मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

स्वप्न बघण्याचा सर्वांना अधिकार :उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही की कोणी स्वप्न बघू नये. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. काही लोकांचं स्वप्न बघण्यात आयुष्य निघून जातं. अनेक लोकं स्वप्न बघतात; परंतु त्या स्वप्नात जनतेची सेवा करण्याचा संकल्प नसेल तर याला आपण 'हसीन सपने' म्हणतो."

संजय राऊतांबद्दल सहानुभूती ठेवा :"उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक म्हणत नसतील तर त्यांना सामना आणि पक्षातून काढून टाकल्या जाईल. त्यांना अजूनही मी शरद पवारांचा नाही तर उद्धव ठाकरेंचा आहे, हे सिद्ध करावं लागत आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणावर लाईव्ह चर्चेचं आवाहन :मराठा आरक्षणावर सरकारनं "लाईव्ह चर्चा" करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "सरकार लाईव्ह चर्चा करेल. अगोदर तुमची काय भूमिका आहे ते सांगा. तुमची भूमिका मराठा आरक्षण द्यायची नव्हती. आता भूमिका बदलली तर स्वतंत्र आरक्षण द्यायचं की ओबीसी मधून आरक्षण द्यायचं हे एकदा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं सांगावं. खरा चेहरा समोर आला तर महाविकास आघाडीची अडचण होईल. सरकारची भूमिका तर स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार संवेदनशील आहे."

निवडणूक कार्यक्षमतेच्या आधारावर व्हावी :देशात निवडणूक कार्यक्षमतेच्या आधारावर झाली पाहिजे. जातीच्या आधारावर निवडणुका व्हायला सुरुवात झाली तर बाकी समाजानं मग कुणाकडे बघावं? जात घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवावी. काही लोकं जातीच्या शिडीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत जाण्याचं स्वप्न पाहतात. आपल्या देशात एकता, समरसता स्वतःच्या खुर्चीच्या स्वप्नासाठी संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे, असं मत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं.

हेही वाचा:

  1. विधानसभेची 'मत'पेरणी! 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ'नंतर आता बळीराजासाठी आणली 'ही' योजना - CM Baliraja Free Power Scheme
  2. "माझ्यावर टीका करणारे गुजरातमध्ये तडीपार होते", शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल - Sharad Pawar on Amit Shah
  3. 'लाडकी बहीण' योजनेमुळं सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Majhi ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details