महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईतून गुजरातला मद्य पुरवठा; बोरीवलीत मद्याच्या 634 बाटल्या जप्त - Liquor Seized - LIQUOR SEIZED

Liquor Seized at Borivali : बोरीवली पोलीस ठाण्याच्या पथकानं बोरीवली इथून गुजरात इथं मद्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई केलीय. या कारवाईत मद्याच्या 634 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मद्याच्या 634 बाटल्या जप्त
मद्याच्या 634 बाटल्या जप्त (Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 6:53 PM IST

Updated : May 12, 2024, 7:20 PM IST

मुंबई Liquor Seized at Borivali: बोरीवली पोलीस ठाण्याच्या पथकानं बोरीवली इथून गुजरात इथं मद्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई केलीय. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. बोरीवली रेल्वे स्थानकासमोरील सुलभ शौचालयासमोर कारवाई करुन हे मद्य जप्त करण्यात आलं असून आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी भरुच येथील गुलाम राज व साबीर शेख, उत्तरप्रदेश येथील पिंटू गुप्ता, नवसारी येथील दिनेश शुक्ला या चार आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत मद्याच्या 634 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी या कारवाईबाबत माहिती दिलीय.

सापळा रचत बोरीवली रेल्वे स्थानकावर आरोपींना अटक : गुजरातमधील भरुच येथील काही व्यक्ती बोरीवली येथील विविध वाईन शॉपमधून मद्याची खरेदी करुन रेल्वेनं ते मद्य गुजरातमध्ये घेऊन जातात व मद्याची विनापरवाना बेकायदा पध्दतीनं वाहतूक करुन गुजरातमध्ये तस्करी करतात, अशी माहिती बोरीवली पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी बोरीवली पोलीस ठाण्याचे काही अधिकारी व कर्मचारी मागील काही दिवसांपासुन सदर मद्य निर्यात करणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवून होते. त्यांना या माहितीप्रमाणे संशयास्पद घटना घडत असल्याचं दिसून आल्यानं बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लाड ,पोलिस उप निरीक्षक प्रमोद निंबाळकर आणि त्यांच्या पथकानं छापा टाकला व कारवाईदरम्यान गुलाम राज व साबीर शेख या दोन आरोपींना दारुच्या भरलेल्या पाच बॅगांसहित पकडलं. सदर आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांचे आणखी दोन साथीदार हे बोरीवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक आठ इथं असल्याचं सांगितलं. त्यानुसार फलाट क्रमांक आठवर पोलिसांनी जावून पाहणी केल्यावर त्याठिकाणी पिंटू गुप्ता व दिनेश शुक्ला या त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांकडून मद्याच्या बाटल्यानं भरलेल्या 6 बॅग जप्त करण्यात आल्या.

634 दारुच्या बाटल्या जप्त : बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात विविध कंपनीच्या 1 लाख 11 हजार 400 रुपये किंमतीच्या दारुच्या 634 बाटल्या विनापरवाना व बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्यामुळं महाराष्ट्र दारुबंदि अधिनियम 1949 कलम 65 ई अन्वये गुन्हा नोंद नोंद करण्यात आलाय. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन, परिमंडळचे 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे व सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा :

  1. "मी दारु पीत नाही", म्हणत सनी देओलनं सांगितलं निर्व्यसनी असल्याचं कारण
  2. Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक
Last Updated : May 12, 2024, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details