कार्यकर्त्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. बावनकुळे म्हणाले, " असे लोक इंग्रजांच्या काळात होते. तेव्हा गुलामगिरीची भाषा होती. नाना पटोले हे गुलामगिरीचा नवा चेहरा आहेत. इंग्रजांची सत्ता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राची संस्कृती पाहता त्यांची ही कृती चुकीची आहे."
नाना पटोले म्हणजे गुलामीचा नवा चेहरा, पाय धुवून घेणं ही लाजिरवाणी घटना- चंद्रशेखर बावनकुळे - Shivsena foundation day 2024
Published : Jun 19, 2024, 7:11 AM IST
|Updated : Jun 19, 2024, 12:33 PM IST
मुंबई- शिवसेनेचा आज 58 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून पक्षाचा वर्धापन दिन स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून षष्मुखानंद सभागृहात पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत. या सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
( राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, देशभरातील विविध घडामोडींसाठी वाचत राहा ईटीव्ही भारतचे हे लाईव्ह पेज!)
LIVE FEED
नाना पटोले म्हणजे गुलामीचा नवा चेहरा, पाय धुवून घेणं ही लाजिरवाणी घटना- चंद्रशेखर बावनकुळे
कोल्हापूर पोलीस दलातील 154 पोलीस शिपाईसह 59 चालक पदासाठी आजपासून होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील 154 पोलीस शिपाई आणि 59 पोलीस चालक पदासाठी पोलीस मुख्यालय जवळील पोलीस परेड ग्राऊंड इथं दिनांक 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी 6 हजार 777 तर पोलीस चालक पदांसाठी 4 हजार 668 अशा 11 हजार 445 उमेदवारांनी अर्ज केलेत आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निप:क्षपातीपणे होणार असून यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिलीय. या भरती प्रकियेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचणीसाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. तसचं एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनादेखील चार दिवसांची मुदताढ देण्यात येणार असल्याचं महेंद्र पंडित यांनी म्हटलंय.
आजपासून पार पाडणार राज्यात पोलीस भरती प्रक्रिया, छत्रपती संभाजीनगरमधील 754 जागेसाठी 97 हजार 835 उमेदवारांचे अर्ज
राज्यातील लाखो तरुण-तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील एकूण 17,471 जागेसाठी ही भरती होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये शहर, ग्रामीण, रेल्वे आणि कारागृह शिपाई पदासाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील 754 जागेसाठी तब्बल 97 हजार 835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेने उच्चशिक्षित तरु देखील या भरतीत आपलं नशीब आजमावून पहात आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार आहे. जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिला जाईल. त्यामुळे कोणीही भरती पासून वंचित राहणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र विद्यार्थ्यांना रात्रीची राहण्याची टॉयलेट बाथरूमची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
वसईतील निर्घृण हत्येचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
प्रियकरानं प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा वसईमधील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात अपलोड करणाऱ्या एका पुरुष आणि महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसामध्ये तक्रार केली होती. मात्र, तिच्या तक्रारीची नोंद करण्यात आली नव्हती, असा आरोप मृत तरुणी आरती यादवच्या बहिणीनं केला.
भुजबळ कोणत्या वाटेनं जाणार, हे माहित नाही-संजय राऊत
मुंबई- " मंत्री छगन भुजबळ आणि ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही. कोणताही राजकीय संबंध नाही. भुजबळ कोणत्या वाटेनं जाणार, हे माहित नाही. भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचे नाही, असा खुलासा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचं खासदार राऊत यांनी सांगितलं.
शेअर बाजार खुला होताच नोंदविला विक्रमी निर्देशांक, घेतली 106 अंकांची उसळी
मुंबई- मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचे चित्र आहे. शेअर बाजार खुला होताच उसळी घेत निर्देशांक 77,581 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा अंक 23,630 वर पोहोचला.
बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा संदेश मिळताच मुंबईत उतरविलं इंडिगोचं विमान
चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात मंगळवारी बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला. हा संदेश मिळताच विमान सुरक्षितपणं रात्री साडेदहा वाजता मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. हा धमकीचा संदेश नवी दिल्लीतील खासगी एअरलाइन्सच्या कॉल सेंटरवर आला होता.
आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हिरावून घेतल्याचं दु:ख-आनंद दुबे
"आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हिरावून घेतल्याचं दु:ख आहे. नाव आणि चिन्ह हिरावून घेऊनही आम्ही लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन आज आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत," असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितलं.
मुंबई: शिवसेनेचे (UBT) प्रवक्ते आनंद दुबे म्हणतात, "शिवसेनेचा स्थापना दिवस 19 जून रोजी आहे. आम्ही सर्वजण तो मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत. दु:ख एवढेच आहे की आमच्या पक्षाचे नाव हिसकावले गेले आणि आमचे निवडणूक चिन्ह हिसकावले गेले. असे असतानाही आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 9 जागा जिंकल्या..." (18.06)
धमक्यांचे सत्र सुरुच, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय उडविण्याची धमकी
बृहन्मुंबई महानगरपालिकेचं (BMC) मुख्यालय उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. या धमकीनंतर पोलिसांनी मुख्यालयात तपास केला असताता काहीही संशयास्पद आढळले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. विशेष म्हणजे मंगळवारी मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालय बॉम्बनं उडविण्याची धमकी देण्यात आली. दुसरीकडं देशभरातील 40 विमानतळांनाही बॉम्बनं उडविण्याची धमकी देण्यात आली होती.