ETV Bharat / state

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे ६.२५ टक्के मतदान

Maharashtra voting live updates
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 3 minutes ago

मुंबई: राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजता ही मतदान प्रक्रिया संपणार आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांसारखे प्रमुख नेते आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. महायुतीला सरकार टिकवण्याचं तर महाविकास आघाडीला सत्ता आणण्याचं मोठ आव्हान आहे.

LIVE FEED

9:41 AM, 20 Nov 2024 (IST)

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ६.२५ टक्के मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.

*विधानसभा मतदारसंघ* *मतदानाची टक्केवारी (अंदाजे)*

१७८धारावी - ०४.७१ टक्के

१७९ सायन-कोळीवाडा - ०६.५२ टक्के

१८० वडाळा – ०६.४४ टक्के

१८१ माहिम – ०८.१४ टक्के

१८२ वरळी – ०३.७८ टक्के

१८३ शिवडी – ०६.१२ टक्के

१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के

१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के

१८६ मुंबादेवी - ०६.३४ टक्के

१८७ कुलाबा - ०५.३५ टक्के

9:16 AM, 20 Nov 2024 (IST)

"विनोद तावडेंना बरीचशी वर्षे ओळखतो, माहितीशिवाय..."-शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरद पवार) शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्रात नक्कीच सत्ता परिवर्तन होईल. जो योग्य उमेदवार त्यांनाच मतदान करा." भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचे आरोप करण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, " बरीच वर्षे त्यांना ओळखतो. माहितीशिवाय बोलणं योग्य नाही." सुप्रिया सुळे यांच्यावर कथित बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, आरोपी हा तुरुंगात राहिलेला आहे. त्यामुळे फारस महत्त्व देण्याची आवश्यकता नाही."

8:58 AM, 20 Nov 2024 (IST)

सुप्रिया सुळे यांची भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात मानहानीची नोटीस

खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केंद्रावर आल्यानंतर कथित क्रिप्टो घोटाळ्याच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया दिली. खासदार सुळे म्हणाल्या, " खोटे संदेश, व्हाईस नोट्स असल्यानं सायबर क्राईमकडं तक्रार दाखल केली. भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची नोटीस पाठविली आहे. त्रिवेदी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहे. ते जेव्हा मला कॉल करतील, त्या शहरात, हव्या त्या वृत्तवाहिनीवर येईल. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत."

8:39 AM, 20 Nov 2024 (IST)

निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर सचिन तेंडुलकरनं बजाविला मतदानाचा हक्क

माजी क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मुंबईत मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंबीय एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. तेंडुलकर कुटुंबीयांनी एकत्र मतदान केलं. सचिन तेंडुलकर केंद्रीय निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर आहे. मतदान करण्याचं भारतरत्न तेंडुलकरनं आवाहनं केले.

8:17 AM, 20 Nov 2024 (IST)

जालना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी कुटुंबासह केले मतदान

जालना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आपल्या कुटुंबासह शहरातील भाग्यनगर येथे संस्कार प्रबोधिनी या शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

8:14 AM, 20 Nov 2024 (IST)

तुम्ही मतदान केले तर तुम्ही प्रश्न विचारू शकता-शिवसेना नेत्या शायना

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एन.सी. यांनी मतदान हक्क बजाविण्याचे महत्त्व सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी आमच्या मुंबईतील लोकांना सांगेन, घराबाहेर पडून मतदान करा. तुम्ही मतदान केले तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण तुमच्या हातावर मतदानाच्या खुणा असल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. लोकशाहीच्या या उत्सवात बाहेर पडून आपली नैतिक जबाबदारी पार पाडा."

8:11 AM, 20 Nov 2024 (IST)

अभिनेता अक्षय कुमारनं बजाविला मतदानाचा हक्क

अभिनेता अक्षय कुमारने 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान केले. अक्षय कुमारनं म्हटलं, "मतदान केंद्रावर अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता ठेवण्यात आलीय. ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली आहे."

7:55 AM, 20 Nov 2024 (IST)

बारामतीची जनता आम्हाला आशीर्वाद देईल -युगेंद्र पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार म्हणाले," मला 100 टक्के विश्वास आहे, बारामतीची जनता शरद पवारांना विसरणार नाही. आम्हाला आशीर्वाद देईल."

7:53 AM, 20 Nov 2024 (IST)

अजित पवारांनी मूळ गावात जाऊन बजाविला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजाविला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ गावी जाऊन मतदान केले.

7:51 AM, 20 Nov 2024 (IST)

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी बजाविला मतदानाचा अधिकार

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

7:50 AM, 20 Nov 2024 (IST)

माजी राज्यपाल राम नाईक यांनी पहाडी शाळेत बजाविला मतदानाचा हक्क

भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गोरेगाव पहाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

Last Updated : 3 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.