ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची मराठीत पोस्ट, राहुल गांधींनी काय म्हटलं? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

Maharashtra Assembly Election Results
विधानसभा निवडणूक निकाल अपडेट (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 6:25 AM IST

Updated : Nov 23, 2024, 7:39 PM IST

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासातच लागणार आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात कोणते उमेदवार विजयी होणार? महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार हे आज स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या निकालासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (एसपी) आणि महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अशी लढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सत्ता येईल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LIVE FEED

7:33 PM, 23 Nov 2024 (IST)

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची मराठीत पोस्ट, राहुल गांधींनी काय म्हटलं?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित आहेत. आम्ही निकालाचे तपशीलवार विश्लेषण करणार आहोत. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद." महायुतीचा विजय झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाचं स्वागत केलं. त्यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटले," विकासाचा विजय! सुशासनाचा विजय! एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊय़ा. एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे तसेच राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील, याची जनतेला मी ग्वाही देतो."

निवडणूक निकालाचे विश्लेषण (Source- ETV Bharat)

7:19 PM, 23 Nov 2024 (IST)

दोन विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे निकाल रखडले!

सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात दोन-तीन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. सिल्लोड निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल राखीव ठेवण्यात आला. सिल्लोडमध्ये तणावाची परिस्थिती असून 144 कलम लागू करण्यात आले. कर्जत - जामखेड विधानसभेचे राष्ट्रवादीचे (SP) उमेदवार रोहित पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. एका EVM मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याने VVPAD मोजणी सुरू आहे.

5:21 PM, 23 Nov 2024 (IST)

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर, कोण विजयी, कोण पराभूत?

*कोल्हापूर उत्तर विधानसभा*

राजेश क्षीरसागर : शिवसेना : मिळालेली मते 10,10,470

राजेश लाटकर: अपक्ष : मिळालेली मते: 80,798,

*राजेश क्षीरसागर 29,827 मतांनी विजयी*

-------------------

*राधानगरी विधानसभा*

प्रकाश आबिटकर: शिवसेना :मिळालेली मते: 1,42,688

के पी पाटील: शिवसेना ठाकरे गट : मिळालेली मते: 1,04,666

*प्रकाश आबिटकर 38,022 मतांनी विजयी*

-------------------

*कागल विधानसभा*

हसन मुश्रीफ: राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते: 1,43,505

समरजित घाटगे :राष्ट्रवादी शरद पवार गट : मिळालेली मते: 1,31,472

*हसन मुश्रीफ 12,033 मतांनी विजयी*

-------------------

*इचलकरंजी विधानसभा*

राहुल आवाडे : भाजप: मिळालेली मते: 1,21,167

मदन कारंडे: राष्ट्रवादी शरद पवार गट: मिळालेली मते: 73,976

*राहुल आवाडे 57,191 मतांनी आघाडीवर*

-------------------

*कोल्हापूर दक्षिण विधानसभा*

अमल महाडिक: भाजप: मिळालेली मते: 10,47,044

ऋतुराज पाटील: काँग्रेस: मिळालेली मते 10,28,913

*अमल महाडिक 18,131 मतांनी विजयी*

-------------------

*शिरोळ विधानसभा*

राजेंद्र पाटील यड्रावकर: अपक्ष: मिळालेली मते: 1,33,731

गणपतराव पाटील : काँग्रेस : मिळालेली मते: 92,882

*राजेंद्र पाटील यड्रावकर 40,800 मतांनी विजयी*

-------------------

*शाहूवाडी विधानसभा*

विनय कोरे : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,36,064,

सत्यजित पाटील सरूडकर: शिवसेना ठाकरे गट: मिळालेली मते: 10,0011

*विनय कोरे 36,053 मतांनी विजयी*

-------------------

*चंदगड विधानसभा*

शिवाजी पाटील: अपक्ष : मिळालेली मते: 83,753

राजेश पाटील :राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते:59,475

नंदाताई बाभुळकर: राष्ट्रवादी शरद पवार: मिळालेली मते:46,787

*शिवाजी पाटील 14,278 मतांनी विजयी*

---------------

*हातकणंगले विधानसभा*

अशोकराव माने : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 13,4191

राजू बाबा आवळे : काँग्रेस: मिळालेली मते: 87,942

सुजित मिणचेकर : स्वाभिमानी पक्ष: 24,952

*अशोकराव माने 46,249 मतांनी विजयी*

---------------------------

*करवीर विधानसभा*

चंद्रदिप नरके : शिवसेना: मिळालेली मते: 1,33,545

राहूल पाटील: काँग्रेस: मिळालेली मते: 1,31,069

संताजी बाबा घोरपडे: जनसुराज्य : मिळालेली मते: 7887

*चंद्रदीप नरके 2447 मतांनी विजयी*

5:16 PM, 23 Nov 2024 (IST)

सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा

सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

भाजपा -४

१) सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले

२) माण - जयकुमार गोरे

३) कराड दक्षिण - डॉ अतुल भोसले

४) कराड उत्तर - मनोज घोरपडे

शिवसेना - २

१)पाटण - शंभूराज देसाई

२) कोरेगाव - महेश शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस - २

१) वाई - मकरंद पाटील

२) फलटण - सचिन पाटील

  • सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार बाळासाहेब पाटील पराभूत झाले आहेत. सातारा जिल्ह्यात शरद पवारांचा करिष्मा चालला नाही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतच काँग्रेसला भाजपाने धूळ चारली आहे.

3:58 PM, 23 Nov 2024 (IST)

हा आमचा ऐतिहासिक विजय-मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकांनी प्रेमानं आमच्यावर मताचा प्रेमानं वर्षाव केला. हा आमचा ऐतिहासिक विजय आहे. या विजयासाठी साष्टांग दंडवत घालावा, असे मतदारांनी काम केलं आहे. पूर्वीच्या सरकारनं बंद पाडलेले काम सुरू केले. आम्ही जे निर्णय घेतले ते भूतो न भविष्यते होते. आम्ही विकासाला प्राधान्य दिलं आहे. आम्ही सर्व घटकांना सोबत घेतले."

3:57 PM, 23 Nov 2024 (IST)

आम्ही आर्थिक शिस्त आणणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, " महाराष्ट्रात कोणत्याही आघाडीला एवढे आजवर यश मिळालं नाही. या यशानं हुरळून जाणार नाही. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्या आहेत. राज्य कंगाल केल्याची आमच्यावर टीका केली आहे. आम्ही आर्थिक शिस्त आणणार आहोत. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. सगळीकडं महायुती चालली आहे. सगळीकडं दारूण पराभव झालेला होता. तुमच्या टीआरपीसाठी आमच्यासाठी माती का करता," असा टोलादेखील अजित पवारांनी माध्यमांना लगावला.

3:35 PM, 23 Nov 2024 (IST)

जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीश महाजन हे सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. गिरीश महाजन हे जवळपास 26000 मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार दिलीप खोडपे यांचा त्यांनी पराभव केला. जामनेर विधानसभा निवडणुकीत संकटमोचक आणि जनतेचे लोकप्रिय नेते गिरीश महाजन यांचा विजय जवळपास निश्चित होताच, जामनेर शहरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी “गिरीश भाऊ जिंदाबाद”च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले आहे. महाजन यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण जामनेर आनंदमय झाला आहे. विजयाच्या आनंदात कार्यकर्ते आणि समर्थकांनी मिरवणुकांचे आयोजन केले असून, शहरातील प्रत्येक चौकात आनंद साजरा केला जात आहे. महाजन यांच्या समर्थकांनी हा विजय त्यांचा नेतृत्वगुण आणि विकासाच्या कामांची पोचपावती असल्याचे म्हटले आहे. "संकटाच्या वेळी गिरीश भाऊ नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले, आणि त्यांची ही विजयी घोडदौड अजूनही कायम राहील," असे भावनिक उद्गार कार्यकर्त्यांनी काढले आहेत. गिरीश महाजन यांच्या विजयामुळे जामनेरच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

*पाटण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे (शिवसेना - शिंदे गट) उमेदवार शंभूराज देसाई 34,624 मतांनी विजयी*

2:52 PM, 23 Nov 2024 (IST)

महायुतीचे उमेदवार आकाशदादा फुंडकर 25 हजारावर मतांनी विजयी

खामगाव विधानसभा मतदार संघात ऐतिहासिक निकाल

खामगाव मतदारसंघात ऍड आकाशदादा फुंडकर यांना 21 व्या फेरी अखेर फुंडकर यांना 1 लाख 1 हजार 213 तर सांनंदा यांना 75 हजार 670 मते होती. तर वंचितचे देवा हिवराळे यांना 22 हजार 431 मते मिळाली. 21 व्या फेरीत 24 हजार 543 मतांची आघाडी मिळाली होती. पहिल्या फेरीपासून आकाश फुंडकर आघाडीवर होते, शेवटच्या 23 व्या फेरीत 25 हजार 619 इतकी आघाडी घेत आकाश फुंडकर यांनी विजय मिळविला आहे. या मतदार संघात माजी आमदार दिलीपकुमार सांनंदा यांचा पराभव झालेला आहे.

2:11 PM, 23 Nov 2024 (IST)

ईटीव्ही भारत महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांनी विधानसभा निवडणुकीचे केलं विश्लेषण, पाहा व्हिडिओ

विधानसभा निवडणुकीच्या निकालातील चित्र कसे आहे? जनतेचा कौल कसा आहे? विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ईटीव्ही भारत महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांनी राजकीय विश्लेषण केलं आहे.

2:03 PM, 23 Nov 2024 (IST)

आमदार शिवेंद्रराजे भोसले १,४२,८२४ मतांनी विजयी, शिवेंद्रराजेंचं रेकॉर्डब्रेक मताधिक्क्य

धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात भाजपा उमेदवारांचा विजय

धुळे शहर : अनुप अग्रवाल

धुळे ग्रामीण : राम भदाणे

साक्री : मंजुळा गावित

शिंदखेडा : जयकुमार रावल

शिरपूर : काशिराम पावरा

-------------------------

सातारा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार शिवेंद्रराजे भोसले १,४२,८२४ मतांनी विजयी झाले आहेत. संपूर्ण राज्यात शिवेंद्रराजेंचं रेकॉर्डब्रेक मताधिक्क्य आहेत.

12:55 PM, 23 Nov 2024 (IST)

अटीतटीच्या लढाईत 1, 114 मतांनी दिलीप वळसे पाटील विजयी

मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके 1,17,000 मतांनी विजयी झाले आहेत. पुणे काँटनमेंट विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार सुनील कांबळे 10,320 मतांनी विजयी झाले आहेत.

अटीतटीच्या लढाईत 1, 114 मतांनी दिलीप वळसे पाटील विजयी झाले आहेत. त्यांना पराभूत करण्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार) शरद पवार यांनी सभा घेतली.

12:50 PM, 23 Nov 2024 (IST)

जनेतेनं महाविकास आघाडीला नाकारले-सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बारामती मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी बारामतीच्या जनतेचे आभार व्यक्त केले. खासदार सुनेत्रा पवार म्हणाले, " आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे. कारण विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर आहे. जनेतेनं महाविकास आघाडीला नाकारले आहे. बारामतीतील जनतेने अजित पवारांना मतदान करून योग्य निकाल दिला. हा निकाल जनतेचा विजय आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.

11:58 AM, 23 Nov 2024 (IST)

कोल्हापूरमध्ये काय आहे स्थिती?

कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर 1100 मतांनी आघाडीवर (अकरावी फेरी)

राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 17060 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)

कागलमधून हसन मुश्रीफ 6726 मतांनी आघाडीवर (सोळावी फेरी)

इचलकरंजी मधून राहुल आवाडे 25910 मतांनी आघाडीवर (नववी फेरी )

कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 21317 मतांनी आघाडीवर (सतरावी फेरी )

शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 26000 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)

शाहूवाडी सत्यजित पाटील 2008 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)

चंदगडमधून शिवाजी पाटील 2774 मतांनी आघाडीवर (नववी फेरी)

करवीरमधून चंद्रदिप नरके 8781 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)

हातकणंगले मधून अशोकराव माने 19993 मतांनी आघाडीवर (नववी फेरी)

11:55 AM, 23 Nov 2024 (IST)

राज्याच्या ग्रामीण भागात काय आहे स्थिती?

जळगावमध्ये अमोल जावळे २८ हजाराने पुढे

*रावेर विधानसभा

*#अठरावी फेरी#*

*अमोल जावळे (भाजपा)* ८५२७८

*धनंजय चौधरी (काँग्रेस)* ५६८२३

*अनिल चौधरी (प्रहार)* १६८२१

*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ८८५२

अहमदनगरमध्ये अकरावी फेरी

महायुती शिंदे शिवसेना , अमोल खताळ- 2 हजार 684

काँग्रेस , बाळासाहेब थोरात- 7 हजार 443

*अकरावी फेरी*

*अमोल खताळ 5 हजार 395 मतांनी आघाडीवर*

---------------------------------

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*

*सहावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी*

*उमेदवार मतांनी 97 मताने आघाडीवर*

एकूण झालेल मतदान - 2,28,871

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

आमश्या पाडवी (शिवसेना)- 8688

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - 18316

डॉ हिना गावित ( अपक्ष) - 18219

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - 4028

11:44 AM, 23 Nov 2024 (IST)

वाशिम जिल्ह्यात महायुतीची तीनही जागांवर आगेकूच

वाशिम : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जिल्ह्यात आता निर्णायक टप्प्याच्या दिशेने सरकली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यातील ३ जागांवर महायुतीच्या उमेदवारांची आगेकूच सुरू असून रिसोडमध्ये शिंदेसेनेच्या भावना गवळी, वाशिममध्ये भाजपचे शाम खोडे तर कारंजात भाजपच्या सई डहाके यांनी आघाडी घेतली आहे.

कारंजा मतदार संघात आठव्या फेरीअंती भाजपच्या सई डहाके यांना २६ हजार ७०२, शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी यांना १४ हजार १२८ आणि वंचितचे सुनिल धाबेकर यांना १३ हजार ५५६ मते आहेत. रिसोड मतदार संघात सातव्याा फेरीअंती कॉग्रेसचे अमित झनक यांना १७ हजार ३८१, शिंदे गटाच्या भावना गवळी यांना १८ हजार २३२ आणि अपक्ष अनंतराव देशमुख यांना १५ हजार ८५६ मते मिळाले आहेत. वाशिम मतदारसंघात आठव्या फेरीनंतर भाजपे शाम खोडे यांना ३४ हजार ९८८ तर ठाकरे गटाचे २९ हजार ५८६ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकंदरीत जिल्ह्याचे चित्र पहाता महायुतीतीनपैकी तीनही जागांवर आघाडीचा डंका दिसून येत आहे.

11:24 AM, 23 Nov 2024 (IST)

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्वच उमेदवार आघाडीवर

2019 निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसकडे असलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघातही भाजपचे उमेदवार अमोल जावळे आघाडीवर

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील पक्षनिहाय उमेदवार

जिल्ह्यातील महायुतीतील उमेदवार

जामनेर- गिरीश महाजन भाजपा

भुसावळ - संजय सावकारे भाजपा

जळगाव शहर - सुरेश भोळे भाजपा

रावेर - अमोल जावळे भाजपा

चाळीसगाव - मंगेश चव्हाण भाजपा

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, शिवसेना

पाचोरा - किशोर पाटील, शिवसेना

मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, शिवसेना

चोपडा - चंद्रकांत सोनवणे, शिवसेना

एरंडोल - अमोल पाटील, शिवसेना

अमळनेर - अनिल पाटील, शिवसेना

11:18 AM, 23 Nov 2024 (IST)

औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर

औरंगाबाद पूर्व 9 वी फेरी

इम्तियाज जलील 64591

गफ्फार कादरी 4155

अतुल सावे 11326

जलील 53 हजार 265 मतांची आघाडी

10:32 AM, 23 Nov 2024 (IST)

चाळीसगाव मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार उन्मेश पाटील पिछाडीवर

  • चाळीसगाव मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना सहाव्या फेरीत 22 हजार 233 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
  • सहाव्या फेरीतच मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळवले आहे.अजूनही 19 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे
  • शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार उन्मेश पाटील हे पहिल्या फेरीपासून चाळीसगाव मतदार संघातून मोठ्या पिछाडीवर पाहायला मिळत आहे....*

10:25 AM, 23 Nov 2024 (IST)

दादा भुसे यांची निर्णायक आघाडी

मालेगाव बाह्य मतदार संघातून मंत्री दादा भुसे यांची निर्णायक आघाडी

30190 मतांची आघाडी मोठी आघाडी ....

10:22 AM, 23 Nov 2024 (IST)

नांदगावमध्ये सुहास कांदे आघाडीवर

*नांदगाव मतदार संघात ५ व्या फेरी अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे २३,२०० मतांनी आघाडीवर

- *अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मोठा धक्का

10:21 AM, 23 Nov 2024 (IST)

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे पाडवी आघाडीवर

*तिसरी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी*

*उमेदवार मतांनी 700 मताने आघाडीवर*

एकूण झालेलं मतदान - 2,28,871

आमश्या पाडवी (शिवसेना)- 3989

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - 9133

डॉ हिना गावित ( अपक्ष) - 8334

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - 1405

10:20 AM, 23 Nov 2024 (IST)

औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाठ आघाडीवर

औरंगाबाद पश्चिम राऊंड 3

संजय शिरसाठ 25708

राजू शिंदे ubt 16272

शिरसाठ 9436 मतांनी पूढे

10:20 AM, 23 Nov 2024 (IST)

प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

राहुरी पाचव्या फेरी अखेर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

शिवाजी कर्डिले (भाजप) ... २७६६०

प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष... २८०४९

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर.

10:16 AM, 23 Nov 2024 (IST)

कोल्हापूरमध्ये कोण आघाडीवर, जाणून घ्या स्थिती

  • कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3246 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
  • राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 8000 आघाडीवर (सहावी फेरी)
  • कागलमधून हसन मुश्रीफ 4095 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)
  • इचलकरंजी मधून राहुल आवाडे 15776 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी )
  • कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 8260 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी )
  • शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी)
  • शाहूवाडी सत्यजित पाटील 926 आघाडीवर (पाचवी फेरी)
  • चंदगडमधून शिवाजी पाटील 5700 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
  • करवीरमधून चंद्रदिप नरके 8374 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
  • हातकणंगलेमधून अशोकराव माने 9500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)

10:14 AM, 23 Nov 2024 (IST)

बारामतीत अजित पवार आघाडीवर

तिसऱ्या फेरीनंतर खडकवासलामधून भीमराव तापकीर आघाडीवर

  • भीमराव तापकीर यांना 16959 तर सचिन दोडके यांना 15776
  • भीमराव तापकीर यांना 1200 मतांची आघाडी

--------------------------------

*बारामती अपडेट*

अजित पवार : 8287

युगेंद्र पवार : 4213

तिसरी फेरी आघाडी : 4047*

चौथ्या फेरी अखेर अजित पवार 15248 मतांनी आघाडीवर*

9:45 AM, 23 Nov 2024 (IST)

महायुतीची 99 जागांवर आघाडी, महाविकास आघाडी किती जागांवर पुढे?

महायुती 99 जागांवर आघाडीवर आहे. (भाजपा 50, शिवसेना 27, राष्ट्रवादी 22)

महाविकास आघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. (राष्ट्रवादी-एसपी 14, काँग्रेस 13, शिवसेना (UBT) 12)

इतर आणि अपक्ष 13 वर आघाडीवर आहेत.

9:40 AM, 23 Nov 2024 (IST)

तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात रोहित पाटील आघाडीवर

तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादीचे (एसपी) रोहित पाटील तिसऱ्या फेरी अखेरी 3,338 मतांनी आघाडीवर आहेत.

9:37 AM, 23 Nov 2024 (IST)

कागलमधून हसन मुश्रीफ आघाडीवर

कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाची तिसरी फेरी

  • कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3834 मतांनी आघाडीवर
  • राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 4389 आघाडीवर
  • कागलमधून हसन मुश्रीफ 1777 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)
  • इचलकरंजीमधून राहुल आवाडे 9425 मतांनी आघाडीवर
  • कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 3209 मतांनी आघाडीवर
  • शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 11000 मतांनी (चार फेरी)
  • शाहूवाडी सत्यजित पाटील 492 आघाडीवर (दुसरी फेरी)
  • चंदगडमधून शिवाजी पाटील 2097 मतांनी आघाडीवर
  • करवीरमधून चंद्रदिप नरके 4500 मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)
  • हातकणंगलेमधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर

9:36 AM, 23 Nov 2024 (IST)

चर्चेत ठरलेल्या काटोल मतदारसंघात सलिल देशमुख पिछाडीवर

काटोल विधानसभा दूसरा राऊंड

भाजप चरणसिंग ठाकूर 7793

सलिल देशमुख तुतारी 3539

चरणसिंग ठाकूर 4254 मतांनी आघाडीवर

एकूण लीड भाजप चरणसिंग ठाकूर 7662 आघाडीवर

9:22 AM, 23 Nov 2024 (IST)

मध्य नागपूर मध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर

मध्य नागपूर मध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर…

बंटी शेळके ६१४९ मते तर

प्रवीण दटके यांना २२४९ मते..

9:09 AM, 23 Nov 2024 (IST)

आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही- बच्चूकडू

मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "या निवडणुकीत जाती-धर्माचे राजकारण झाल्याचे मला वाटते. मुद्द्यावर आधारित चर्चा झाली नाही, हे दुर्दैव आहे. आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही."

9:08 AM, 23 Nov 2024 (IST)

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाचपुते आघाडीवर

श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल

*फेरी क्रमांक=1*

1)अनुराधाताई नागवडे =1732

2)विक्रमसिंह पाचपुते =5236

4)अण्णासाहेब शेलार =466

10) राहुल जगताप =1342

9:07 AM, 23 Nov 2024 (IST)

सई विधानसभा (प्रथम फेरी)

१. हितेंद्र ठाकूर (बविआ) - 3722

२. ⁠स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) -2711

३. ⁠विजय पाटील (कॅांग्रेस) -

जितेंद्र ठाकूर 800 मतांनी आघाडीवर

9:06 AM, 23 Nov 2024 (IST)

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे आघाडीवर

- नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे ईव्हीएम मतमोजणी आघाडीवर

- टपाल मतमोजणीत एकूण 1590 मते

- टपाल मतमोजणीतदेखील देवयानी फरांदे यांची आघाडी

8:28 AM, 23 Nov 2024 (IST)

बारामती मतदारसंघामध्ये पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर

पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर आहेत. तर युगेंद्र पवार आघाडीवर आहेत. खडकवासला विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांनी VVPAT SLIP ची मतमोजणी करण्यात यावी, अशी अशी मागणी निवडणुक अधिकार्‍यांकडे केली आहे.

8:07 AM, 23 Nov 2024 (IST)

बारामतीत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्रिस्तरीय तपासणी

बारामती मतदारसंघाच्या मतमोजणी पूर्वी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस उप पोलीस अधीक्षक सुदर्शन राठोड म्हणाले"निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. आम्ही प्रत्येकाची तपासणी करत आहोत. येथे सुमारे 250 जवान आणि 20 अधिकारी उपस्थित आहेत."

7:35 AM, 23 Nov 2024 (IST)

बारामतीत युगेंद्र पवार काका अजित पवारांना देणार टक्कर?

उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वी तयारी करण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

6:30 AM, 23 Nov 2024 (IST)

कलिना येथील मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त, सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 मतदारसंघासाठी मतदान झाले. या जागांकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. कलिना येथील मतमोजणी केंद्राबाहेर निवडणूक आयोगाकडून माहितीफलक लावण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Last Updated : Nov 23, 2024, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.