पुणे Sharad Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात आणि त्यांचं कर्तृत्व निर्माण करण्यात त्यांच्या आईचं जिजामातेचं खरं योगदान आहे. हे सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु काही लोकं चुकीचा इतिहास सांगण्यात धन्यता मानत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तुत्वाची गाथा जर कोणी घडवली असेल तर ती फक्त त्यांच्या आईनं घडवली. त्यामुळे त्यांच्या आईच्या योगदानाला दुर्लक्ष करून इतरांना त्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊ माताचचं योगदान आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज पुण्यात दिली.
योगी आदित्यनाथ यांनी काय केलं वक्तव्य:आळंदीमध्ये गीता भागवताचा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी यांनी आयोजित केला. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात समर्थ रामदासांचं योगदान असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे गोविंददेवगिरी महाराज करत असल्याचं म्हटलं. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू हे समर्थ रामदास असल्याच्या कथित दाव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला.