महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसानं उडवली दाणादाण ; कुठं शाळा बंद, कुठं अडकले मंत्री, जोरदार पावसाचा चाकरमान्यांना फटका - IMD Issues Red Alert

IMD Issues Red Alert : मुंबईत आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज मुंबई, ठाणे, पुणे, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. धुव्वांधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

IMD Issues Red Alert
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 7:32 AM IST

मुंबई IMD Issues Red Alert :मायानगरी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रविवारपासून जोरदार पावसानं दाणादाण उडवल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज राज्यातील अनेक शहरात हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आदी जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली. मुंबईत अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहे. विशेष म्हणजे रेल्वेत आमदार अडकल्यानं विधीमंडळाच्या अधिवेशनालाही पावसाचा फटका बसला आहे.

मुंबईतील सर्व शाळांना सुटी जाहीर :मुंबईत सध्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवल्यानं जमजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं पहिली ते 12 वी पर्यंतच्या सगळ्या शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुटी जाहीर केली. याबाबत महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील जोरदार अतिवृष्टी पाहता प्रशानासनाकडून मंगळवारी मुंबई महानगरपालिका हद्दील सर्व शाळा बंद राहतील, असे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यासह ठाण्यातही जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत केल्यामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील शाळेला सुटी देण्यात आली आहे.

पुण्यातील शाळांनाही मुसळधार पावसाचा फटका :जोरदार पावसानं पुण्यासह राज्यातील इतर शहरांनाही झोडपलं. पुणे प्रादेशिक हवामान केंद्रानं पुण्यात 9 जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे मुसळधार पावसानं कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली. मात्र मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या वेळेत आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी शाळेत येण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. नाव मोठं लक्षण खोटं! आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पावसाळ्यात देऊ शकत नाही मुलभूत सुविधा - Mumbai Rain
  2. मुसळधार पावसामुळं मुंबईत पाणी साचलंय; 'वेळ आलीच तर मदतीसाठी सैनिक, नौदल, हवाई दल तयार', मुख्यमंत्री शिंदेंची माहिती - CM Eknath Shinde
  3. मुंबई तुंबली पावसात; राजकारणी तुंबले आरोप-प्रत्यारोपात - Mumbai Rain

ABOUT THE AUTHOR

...view details