सातारा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवडे टोलनाक्यावर तपासणी दरम्यान ५ कोटींचं सोनं आणि ६० किलो चांदीचा समावेश आहे. ही कारवाई FST पथक, GST अधिकारी, आयकर अधिकारी, तहसीलदार आणि कराड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. जप्त ऐवजाच्या तपासणीमध्ये ९ किलो सोने आणि ६० किलो चांदी असल्याचे आढळून झाले. त्याची अंदाजे किंमत ७ कोटी ५३ लाख रुपये आहे.
सध्या आयकर विभागाकडून इनवाइसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली ठेवले आहेत. जप्त ऐवज तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी कराड उत्तर FST पथकाने घेतली आहे.
तासवडे टोलनाक्यावर सापडलं घबाड-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवडे टोलनाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. रविवारी रात्री कोल्हापूरकडून मुंबईकडे निघालेल्या कारचा संशय आल्यानं पोलिसांनी त्या कारची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी कारमध्ये सोनं आणि चांदी मिळून ५ कोटींचं घबाड सापडलं. तळबीड पोलिसांनी संबंधित कार, सोनं आणि चांदी ताब्यात घेतली. सध्या प्राप्तिकर विभाग आणि जीएसटी विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.