परळीत गोळीबार; सरपंच जागीच ठार, 2 जखमी - Parli firing - PARLI FIRING
Parli firing : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात आज रात्री झालेल्या गोळीबारात परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Published : Jun 29, 2024, 11:06 PM IST
बीडParli firing : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात आज रात्री झालेल्या गोळीबारात परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ज्ञानोबा गित्ते यांच्यासह एक जण गंभीर जखमी झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बँक कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली. दरम्यान, गोळीबार कोणी केला याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलीस पुढील तपास करत आहेत. जखमी ज्ञानोबा गित्ते यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अद्याप पोलिसांकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.