महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलवामा हल्ला हा देखील एक वोट जिहाद; संजय राऊतांचा हल्लाबोल, जागा वाटपावरुन काँग्रेसलाही फटकारलं - ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपावरुन संजय राऊत यांनी काँग्रेसला चांगलंच फटकारलं आहे. राज्यातील नेते सक्षम नाहीत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी काँग्रेसवर केला.

Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 11:05 AM IST

Updated : Oct 18, 2024, 12:52 PM IST

मुंबई :महाविकास आघाडीची विधानसभा निवडणूक 2024 ची तयारी पूर्ण झाली आहे. जागा वाटपाबाबत आज आपण राहुल गांधी यांच्यासोबत बोलणार आहोत. मात्र पुलवामा हल्ला हा देखील एक वोट जिहाद आहे, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. संजय राऊत हे आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील नेते निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही :आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. मात्र या जागा वाटपावर आज संजय राऊत यांनी मोठा हल्लाबोल केला. राज्यातील नेते निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे आज जागा वाटपावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीका केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

पुलवामा हल्ला हा देखील एक लव्ह जिहाद :विधानसभा निवडणूक 2024 ची तयारी सध्या सगळ्यात राजकीय पक्षाकडून सुरू आहे. याबाबत बोलताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. "महाविकास आघाडीचं जागा वाटप गतीनं व्हावं. काँग्रेसचा निर्णय राज्यात झाला, तर जागा वाटपाला गती येईल. काही जागांवर गाडी अडली आहे. त्यावर मार्ग निघेल. 200 जागांवर आमची सहमती झाली आहे. राज्यातील नेते निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीत. तरीही भाजपासोबत कसं लढायचं हे आम्हाला माहिती आहे. पुलवामा हल्ला हा देखील एक वोट जिहाद आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. न्यायदेवतेच्या हातात आता संविधान, डोळ्यावरची पट्टी हटवल्यानं भ्रष्टाचार उघड्या डोळ्यांनी बघावा लागणार- संजय राऊत
  2. दहा हजार वर्षात एवढे लाचार आणि लोचट सरकार झाले नव्हते - संजय राऊत
  3. मित्र पक्षांबाबत भाजपाचं धोरणच काँग्रेस राबवतंय? संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Last Updated : Oct 18, 2024, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details