मुंबई-अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून ( Saif Ali Khan news) डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी संशय व्यक्त केला. पाच दिवसानंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर सैफ अली एवढा तंदुरुस्त कसा आहे, असा प्रश्न निरुपम यांनी एक्स सोशल मीडियावर उपस्थित केला.
अभिनेता सैफ अली खान मंगळवारी लिलावती रुग्णालयातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित हास्य दिसून आलं. त्यानं माध्यम आणि चाहत्यांना अभिवादन केलं. सहा वार झाल्यानंतही अभिनेता सैफ अली खान हे नेहमीप्रमाणं व्यवस्थित चालताना दिसत होता. नेमकी हीच बाब माजी खासदार संजय निरुपम यांना खटकली आहे. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "डॉक्टरांच्या माहितीनुसार सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचचा चाकू घुसला होता. अंदाजे हा चाकू पाठीत घुसला होता. सलग सहा तास शस्त्रक्रिया चालली. ही घटना १६ जानेवारीची आहे. २१ जानेवारीला रुग्णालयातून बाहेर पडताना तो एवढा तंदुरुस्त (फिट) कसा आहे? केवळ पाच दिवसात? कमाल आहे".
डॉक्टरांनी अभिनेत्याला दिला विश्रांतीचा सल्ला-अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात बांगलादेशी आरोपीनं हल्ला केल्यानंतर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पाठीतून चाकुचा घुसलेला तुकडा काढण्यात आला. सैफची प्रकृती सुधारली असली तरी त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे काही दिवस त्याला शूटिंगपासून दूर राहावे लागणार आहे.
पोलीस तपासात काय आहे अपडेट?-अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या मुंबई पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरात नेऊन मंगळवारी गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं आहे. वांद्रे पोलिसांनी घरातून आरोपी शहजादचे कपडे जप्त केले आहेत. याच कपड्याचा वापर करून आरोपीनं चेहरा झाकला होता, असा पोलिसांना संशय आहे. सैफ अली खानबरोबर झालेल्या झटापटीत आरोपीचे कपडे सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीत पडल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीचे सापडलेला कापड आणि आरोपीचे केस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत.
हेही वाचा-
- सैफ अली खानला अभिनेताच देणार सुरक्षा सेवा, गुन्हे रिक्रिएशनमध्ये पोलिसांना काय आढळलं?
- सैफ अली खानच्या सुरक्षेसाठी वांद्रेतील घरी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे
- सैफ अली खान हल्ला प्रकरण: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कसा दिसला नाही शरीफुल इस्लाम, मुंबई पोलिसांच्या डोक्याला झाला ताप, कंट्रोल रुममध्ये...