ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सचिन वाझेला आणखी एक झटका, ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात न्यायालयानं फेटाळला माफीच्या साक्षीदाराचा अर्ज - ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण

Sachin Waze : ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे महत्त्वाचा आरोपी आहे. त्यामुळं त्यानं केलेल्या माफीच्या साक्षीदारातील दावे अमान्य करत मुंबई सत्र न्यायालयानं त्याचा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज हा फेटाळून लावलाय.

ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात सचिन वाझेचा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज न्यायालयानं फेटाळला
ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात सचिन वाझेचा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज न्यायालयानं फेटाळला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 9:17 AM IST

मुंबई Sachin Waze : विविध गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा आरोपी आहे. त्यामुळंच मुंबई सत्र न्यायालयानं त्यानं केलेल्या माफीच्या साक्षीदारातील दावे मान्य केले नाहीत. त्याचा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज हे फेटाळून लावलाय.


न्यायालयानं फेटाळला अर्ज : 2003 मध्ये ख्वाजा युनूस याचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी महाराष्ट्र सीआयडी यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोप निश्चित करुन खटलादेखील दाखल केला. त्याच प्रकरणात सचिन वाझेला विनाकारण गुंतवलं गेलेलं आहे, असं म्हणत त्यानं माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात केला होता. घाटकोपरला 2002 मध्ये बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ख्वाजा युनूस संशयित आरोपी होता. त्याला अटक केल्यानंतर कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आणि गुन्हा सचिन वाझेवर दाखल आहे.



सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार दाखल अर्जात काय :मुंबईच्या घाटकोपरमध्ये बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवाद्यांनी केलेला बॉम्बस्फोट होता. या स्फोटानंतर ख्वाजा युनूस आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यातून त्यांची आणि आरोपामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सचिन वाझेनं त्याच्या माफीच्या साक्षीदारकरिता न्यायालयात केलेल्या अर्जात नमूद केलंय की, युनूस याचा मृत्यू झाला. याचा ताबा कधीही सचिन वाझेकडे दिला गेला नव्हता. तसंच मुंबई पोलीस गुन्हे शाखेमध्ये सचिन वाझेकडून ख्वाजा युनूसची चौकशीदेखील करण्यात आली नव्हती. त्यामुळं सचिन वाझेला गुंतवण्यात आलं. वाझेनं यासंदर्भात 5 जानेवारी 2003 रोजी मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे तक्रारदेखील केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घरासमोर जेलेटिन ठेवल्याच्या प्रकरणात वाझे हा तुरुंगात आहे. त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.



हेही वाचा :

  1. ख्वाजा युनूस प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवा, सचिन वाझेचा न्यायालयात अर्ज
  2. Sachin Vaze Extortion Case : खंडणी वसुली प्रकरण; सचिन वाझेची सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब
  3. Antilia Bomb Scare Case : सचिन वाझेची सुटकेसाठी न्यायालयात धाव; साक्षिदार म्हणून तुरूंगवास भोगणे अन्यायकारक

ABOUT THE AUTHOR

...view details