नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी (5 जाने.) महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) द्वारे बांधलेल्या राज्यातील सात उड्डाणपुलांचं लोकार्पण केलं. यावेळी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "महारेलने महाराष्ट्रात उड्डाणपुलांच्या बांधकामाच्या गतीचा नवा विक्रम केलाय. येत्या काही दिवसांत या कंपनीच्या माध्यमातून 200 उड्डाणपूल आणि अंडरपासचं काम पूर्ण केलं जाणार आहे. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत." तसंच संपूर्ण महाराष्ट्रात मेट्रो, रस्ते, महामार्ग, विमानतळ आणि बंदरे यासारख्या पायाभूत सुविधांची कामं वेगानं सुरू असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज राज्यातील विविध ठिकाणी महारेलनिर्मित ७ उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये खालील उड्डाणपुलांचा समावेश आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 5, 2025
✅ नागपूर : गोधनी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. २९३ येथील उड्डाणपूल.
✅ अमरावती : चांदुर रेल्वे स्थानकाजवळील… pic.twitter.com/fFCayD8rjv
पुढं ते म्हणाले की, " आम्ही सुरुवातीपासूनच राज्याच्या समतोल विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिलाय. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतांना मी तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री या जबाबदारीतून महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूल आणि इतर प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता. राज्यात अत्यावश्यक असलेल्या रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची संख्या लक्षात घेता हे काम वेगानं पूर्ण करण्यासाठी एका कंपनीची नितांत आवश्यकता त्यावेळी भासली होती. वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त सहभागातून महारेल ही स्वतंत्र कंपनी आपण साकारली. एका वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श महारेलनं स्थापित करुन दाखवला."
'या' उड्डाणपुलांचा समावेश :
- नागपूर : गोधनी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. 293 येथील उड्डाणपूल
- अमरावती : चांदुर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. 70 येथील उड्डाणपूल
- वर्धा : सिंदी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. 103 येथील उड्डाणपूल
- चंद्रपूर : बाबूपेठ, चंद्रपूर येथील रेल्वे फाटक क्र. 43 ए/143 ए येथील उड्डाणपूल
- धुळे : दोंडाईचा शहरातील रेल्वे फाटक क्र. 105 येथील उड्डाणपूल
- जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. 149 येथील उड्डाणपूल
- वाशिम : वाशिम रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्र. 115 येथील उड्डाणपूल
हेही वाचा -
- सरकारमध्ये एकच ॲक्टिव्ह माणूस, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सुप्रिया सुळेंकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव
- मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करून बाहेरून येणाऱ्यांची गर्दी कमी करणार - देवेंद्र फडणवीस
- अहेरी ते गर्देवाडा बससेवा पहिल्यांदाच सुरू; देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांनी नक्षलवाद नाकारल्यानं उगवली नवी पहाट