ETV Bharat / entertainment

यश त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देईल सरप्राईज, 'टॉक्सिक'चं नवीन पोस्टर रिलीज - YASH NEW MOVIE TOXIC

रॉकिंग स्टार यश त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त 'टॉक्सिक' या चित्रपटाद्वारे चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देणार आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटामधील पोस्टर शेअर केले आहे.

yash drops new poster
यशनं रिलीज केलं नवीन पोस्टर (यश (Film Toxic Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 6, 2025, 11:43 AM IST

मुंबई : रॉकिंग स्टारर यश आता त्याच्या पुढील बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' चित्रपटच्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. यशनं त्याच्या 'केजीएफ' फ्रँचायझीद्वारे जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तेव्हापासूनच चाहते त्याचा पुढील चित्रपट 'टॉक्सिक'च्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. यश स्टारर 'टॉक्सिक' हा चित्रपट येत्या, काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. गेल्या वर्षी 'टॉक्सिक' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर यशचे चाहते 'टॉक्सिक' या चित्रपटाच्या पुढील अपडेटची वाट पाहत आहेत.

'टॉक्सिक' चित्रपटामधील नवीन पोस्टर : आज 6 जानेवारी रोजी यशनं त्याच्या चाहत्यांना 'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट दिली आहे. यश 8 जानेवारी रोजी त्याचा 39 वा वाढदिवशी साजरा करणार आहे. या दिवशी तो आपल्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देणार आहे. आज, 6 जानेवारी रोजी 'केजीएफ' स्टारनं 'टॉक्सिक' चित्रपटामधील एक पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो टोपी घालून विंटेज कारजवळ धूम्रपान करताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये यशचा चेहरा हा दिसत नाही, मात्र तो स्टाईलनं उभा आहे, ते पाहण्यासारखे आहे. यशनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'त्याला मुक्त करायचे आहे...'

साऊथ स्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज: याशिवाय या पोस्टच्या पोस्टरमध्ये असं देखील लिहण्यात आलं आहे की, ' 8 जानेवारीला सकाळी 10.25 वाजता भेटूया.' 'टॉक्सिक' हा एक ॲक्शन ड्रामा आहे, ज्यामध्ये यशचा एक वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत आहेत. तसेच केव्हीएन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई पल्लवी, करीना कपूर, नयनतारा आणि नवाजुद्दीन सिद्दीक देखील या चित्रपटात दिसू शकतात, मात्र यश व्यतिरिक्त, चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टबद्दल निर्मात्यांनी माहिती उघड केलेली नाहीत. 'टॉक्सिक' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. केजीएफ स्टार यशनं 'टॉक्सिक'च्या शूटिंगला केली सुरुवात, फोटो व्हायरल - yash and toxic movie
  2. 'केजीएफ' स्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाची लेटेस्ट अपडेट, हॉलिवूड स्टार करणार 'रॉकी भाई'बरोबर अ‍ॅक्शन - KGF star Yash Toxic movie
  3. 'अल्फा' चित्रपट यंदा ख्रिसमसला रिलीज होणार, यशराज फिल्म्सची घोषणा - Alpha release on Christmas

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.