महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांदा खातोय भाव : सण उत्सवानंतरही भाज्यांचे भाव कडाडले, गृहिणींचं बजेट बिघडलं - TODAY MARKET RATE

दिवाळी उत्सव 2024 पार पडल्यानंतर भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. मात्र कांद्याचे भाव वधारल्यानं गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलं आहे.

Today Market Rate
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 9:04 AM IST

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भाज्यांचे भाव कडाडले आहेत. सण उत्सवानंतर भाव कमी होतील, असा अंदाज होता. मात्र आवक वाढून सुद्धा भाव मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट बिघडलं आहे.

भाजीपाला खरेदी करताना गृहिणी (Reporter)

सण उत्सवानंतरही भाज्यांचे भाव कडाडले :स्वयंपाक घरात रोज दोन वेळा लागणारी वस्तू म्हणजे भाजी, आज कोणती भाजी करावी, असा प्रश्न महिलांना पडतोय. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाज्या इतक्या महागल्या आहेत, की जिथं रोज दोन भाज्या केल्या जात होत्या, तिथं आता एकच भाजी केली जाते. रात्रीची भाजी सहसा होतच नाही. त्याऐवजी अनेक ठिकाणी भाताच्या खिचडीला पसंती दिली जाते. बाजार समितीत भाज्यांची आवक वाढलीय, मात्र तरी देखील भाव कमी होण्याचं नाव घेत नाही. कांद्याचे दर मात्र गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच वाढले आहेत. 25 ते 30 रुपये किलोनं विक्री होणारा कांदा आता 80 ते 90 रुपये किलोनं विक्री होत आहे. नेहमीच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात कांद्याचे दर वाढल्यानं दोन पैसे जास्तीचे जमा होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

भाजीपाला खरेदी करताना गृहिणी (Reporter)

पुढील काही दिवस भाज्यांचे भाव राहतील चढे : "मागील सहा महिन्यापासून आम्हाला मार्केट कमिटीमधून जास्त दरानं भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दोन पैसे ठेवून आम्हालाही पुढं ग्राहकांना विक्री करावी लागत आहे. मात्र भाव जरी जास्त असले तरी बटाटे, कांदा, भेंडी आदींना मागणी जास्त आहे. पुढील काही दिवस भाज्यांचे भाव चढे राहतील," असं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं.

दिवसातून एकदा करतो भाजी : "सणासुदीत भाज्यांचे भाव वाढले, गणपती, नवरात्र आणि आता दिवाळीनंतर सुद्धा भाजीपाल्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जिथे मी नेहमी एक किलो भाजी घेत होते, तिथे आता अर्धा किलो घेते. तसेच दिवसातून एक वेळा भाजी करते, तर रात्रीच्या जेवणात खिचडी बनवते," असं ग्राहक महिलेने सांगितलं.

हेही वाचा :

  1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा 'कांद्याबाबत मोठा निर्णय' - Onion Export
  2. केंद्र सरकार पुन्हा कांदा निर्यात बंदी करणार नाही - अजित पवार - Ajit Pawar On onion export
  3. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही का? शरद पवारांचा मोदींना प्रश्न - Sharad Pawar Question About Onion

ABOUT THE AUTHOR

...view details