महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे शहरात पावसाचा हाहाकार; आज शाळा राहणार बंद - Pune Rain Update

Pune School Close : पुण्यात सुरू असलेल्या मुळसळधार पावसामुळं पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आज (25 जुलै) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेत. तसंच पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

Pune Rain Updates heavy rain in Pune city and district areas district collectorate declared holiday in schools
पुणे शहरात पावसाचा हाहाकार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 9:07 AM IST

Updated : Jul 25, 2024, 10:09 AM IST

पुणे Pune School Close : राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळं नद्या, नाले दुथडी भरुन वाहताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. तसंच येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा हवामान विभागानं इशारा दिलाय. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज (25 जुलै) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा घेतला आढावा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत आणि बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी. धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.

पुण्यात मुसळधार पावसामुळं शाळांना सुट्टी जाहीर (ETV Bharat Reporter)

घराबाहेर जाणं टाळावं : खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलंय. दरम्यान, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सध्या 35 हजार 574 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसंच धरण परिसरात 100 मिमी आणि घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालीय. पावसाच्या प्रमाणानुसार कमी अथवा जास्त विसर्ग होण्याची शक्यता आहे.

'या' ठिकाणी दक्षता घेण्यात यावी :

  1. भिडे पूल
  2. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर
  3. शितळा देवी मंदिर डेक्कन
  4. संगम पूल पुलासमोरील वस्ती
  5. महानगरपालिकेजवळील पूल
  6. होळकर पूल
  • अनेक घरात पावसाचं पाणी शिरलं : सिंहगड रोडवरील एकता नगरी परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या गृहनिर्माण सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत. तर 38 ठिकाणी झाड पडल्याच्या घटना आहेत. दोन ठिकाणी पावसामुळं घर पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा -

  1. भंडाऱ्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टी, गोसे धरणाची 33 दारं उघडली; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Bhandara Rain Updates
  2. मुंबईत बरसणार मुसळधार पाऊस ; ऑरेंज अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा - Mumbai Rain Updates
  3. मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert
Last Updated : Jul 25, 2024, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details