बुलावायो ZIM vs PAK 2nd ODI Live Straming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वे संघ 1-0 नं आघाडीवर आहे.
Zimbabwe win the first ODI by 80 runs on DLS method.#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/LVPqGY8C2U
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 24, 2024
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेनं DLS पद्धतीनं पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ 40.2 षटकांत 205 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघानं 21 षटकांत 6 गडी गमावून 60 धावा केल्या. त्यानंतर पावसानं सामन्यात व्यत्यय आणला आणि झिम्बाब्वेनं 80 धावांनी सामना जिंकला. आता दुसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वे संघ मालिकेवर कब्जा करु इच्छितो. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला दुसरा वनडे सामना जिंकायचा आहे आणि मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तानच्या दिग्गजांना विश्रांती : पाकिस्तानचा संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना सहा सामन्यांच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे, झिम्बाब्वेवर विजय मिळविण्यासाठी पुरेशी आहे. झिम्बॉब्वे संघाकडून क्रेग एर्विन वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व करणार आहे. अनुभवी अष्टपैलू शॉन विल्यम्ससह प्रमुख खेळाडू सिकंदर रझा याच्या समावेशामुळं त्यांची फळी मजबूत झाली आहे आणि त्यांना पाकिस्तानला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे.
Zimbabwe stun Pakistan to take a 1-0 lead in the ODI series 🙌
— ICC (@ICC) November 24, 2024
📝 #ZIMvPAK: https://t.co/lBM2jgBTBj pic.twitter.com/CuKFfXSf4j
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे एकूण 63 वनडे सामने झाले. यात पाकिस्ताननं 54 सामने जिंकत एकहाती वर्चस्व राखलं आहे. तर झिम्बाब्वे संघानं 6 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एका सामना टाय झाला आहे.
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना, 24 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- दुसरा वनडे सामना, 26 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- तिसरा वनडे सामना, 28 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
At Queens Sports Club, Zimbabwe defeat Pakistan by 80 runs (Duckworth-Lewis) in the ODI series opener. 👏#ZIMvPAK #VisitZimbabwe pic.twitter.com/icUAHmP3WD
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) November 24, 2024
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना कधी होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना आज, मंगळवार, 26 नोव्हेंबर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. याची नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे प्रसारण झाल्याची कोणतीही माहिती नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवनाशे मारुमनी, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्डन, रिकान मायडर्स, डिओन मायडर्स. विल्यम्स.
पाकिस्तान संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (कॅण्ड विकेट), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज दहनी, तय्यब ताहिर.
हेही वाचा :