ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागते का? घटनातज्ज्ञ म्हणतात... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल? किंवा यापूर्वी विधानसेभेची मुदत संपल्यानंतर 10-15 दिवसांनंतरही सरकार स्थापन केलंय का? अशा काही घटना घडल्यात? यावर घटनातज्ज्ञांनी काय म्हटलंय? पाहू यात...

vidhan Bhavan
विधान भवन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 7:06 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूनं लागलाय. त्यामुळं आता स्थापनेच्या हालचालींनी जोर पकडला असून, या धर्तीवर महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणमीमांसेचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महायुतीला कौल जनतेनी दिल्यानंतर आम्ही 25 नोव्हेंबर रोजी शपथ घेऊ, असं महायुतीतील नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणाला किती मंत्रिपदं द्यायची, कोणाला कोणती खाते द्यायची, यावर एकमत होत नसल्यामुळं शपथविधी लांबणीवर गेलाय. या आठवड्याच्या शेवटी शपथविधी होणार असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रपती राजवटीबाबत लोकांमध्ये संभ्रम : 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी राजवट लागते का? किंवा विधानसभेची मदुत संपल्यानंतर पुढे सरकार स्थापन करण्यास किती दिवसाच्या अवधी असतो? विधानसभेची मुदत संपल्यानंतर लगेच सरकार स्थापन न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते का? आणि स्पष्ट बहुमताचा आकडा असल्यास किती दिवसानंतर सरकार स्थापन करता येते? मात्र विलंब झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागते का? असे अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहेत. राष्ट्रपती राजवटबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. वरील परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपती राजवट लागेल? किंवा यापूर्वी विधानसेभेची मुदत संपल्यानंतर 10-15 दिवसांनंतरही सरकार स्थापन केलंय का? अशा काही घटना घडल्यात का? यावर घटनातज्ज्ञांनी काय म्हटलंय? पाहू यात...

...तर राष्ट्रपती राजवट लागत नाही : खरं तर निवडणूक निकाल लागल्यानंतर जे राजकीय पक्ष सरकार स्थापन करणार आहेत. त्यांच्याकडे जर बहुमताचा स्पष्ट आकडा असेल आणि तो आकडा त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला. तसेच काही दिवसांचा अवधी मागून घेऊन आपण 8-10 दिवसांनी सरकार स्थापन करणार, असे सांगितलं तर विधानसभा निवडणूक मुदत संपल्यानंतरही शपथविधी आणि सरकार स्थापन करता येतंय. मात्र या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होत नाही, अशी घटना सांगते, अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिलीय." पण यादरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री राहता येत नाही. दरम्यान, आता जे सरकार येणार आहे, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. त्यामुळं त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे आणि सरकार स्थापन करण्यास अवधी मागितला आहे. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू होणार नसल्याचंही घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय.

तेव्हाही राष्ट्रपती राजवट लागली नव्हती : 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपत आहे, त्यामुळं मध्यरात्री 12 वाजल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, ही धारणा चुकीची आहे. विधानसभेची मुदत संपल्यानंतर लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवा नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही. यापूर्वी देखील विधानसभेची मुदत संपल्यानंतरही 8-10 दिवसांनी सरकार स्थापन करण्यात आलंय किंवा नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. तेव्हाही राज्यात राष्ट्रपती राजवट लागलेली नव्हती.

यापूर्वी असं कधी घडलं...

- 10 व्या विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली होती. यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 10 ते 12 दिवसांनी झाला म्हणजे 1 नोव्हेंबर 2004 रोजी नवीन सरकार अस्तित्वात आले.
- 11 व्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली होती. मात्र यानंतर चार दिवसांनंतर म्हणजे 7 नोव्हेंबर 2009 रोजी नवीन सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
- 12 व्या विधानसभेची मुदत 31 ऑक्टोबर 2024 रोजी संपली होती. मात्र नवनिर्वाचित सरकार 8 नोव्हेंबर 2014 रोजी स्थापन झाले.
- 13 व्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली होती. मात्र 14 व्या विधानसभेतील नवीन सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा 28 नोव्हेंबर 2019 रोजी शपथविधी झाला होता.

हेही वाचा-

  1. 'शहाण्या, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती, तर . .'; अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला; काका पुतण्यात 'प्रितीसंगम'
  2. सायबर कॅफे चालक ठरला जायंट किलर, अमोल खताळ यांचा थक्क करणारा जीवन प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.