ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी; रोहित पवारांची मागणी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

जे कोणी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परत असं कोणी करू नये, अशी कडक कारवाई सरकारने केली पाहिजे, असंही यावेळी रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar
रोहित पवार (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 4:17 PM IST

पुणे- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय. आता आरोपी कोण आहे हे कळलंय. अजून आरोपी पकडले आहेत, पण अजून एक आरोपी राहिलाय. जे कोणी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परत असं कोणी करू नये, अशी कडक कारवाई सरकारने केली पाहिजे, असंही यावेळी रोहित पवार म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पुणे दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवण्यात येणार : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्यात आलेत. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. त्यात सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले, मग आता टप्प्याटप्प्याने 70 टक्के शेतकऱ्यांचे पैसे थांबलेत. आता निवडणुका झाल्यात, भाजपा मित्र पक्षाला बहुमत मिळालंय, त्यामुळे आता हळूहळू टप्प्याटप्प्याने आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवण्यात येणार आहे. आम्ही विरोधात आहोत, पण लाडक्या बहिणींसाठी आम्ही भांडू, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.

योग्य कलम लावून योग्य कारवाई झाली पाहिजे : वाल्मिकी कराड यांच्या सोबतचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत. याबाबत आमदार रोहित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, धनंजय मुंडे हे आमच्या पक्षातील मोठे नेते होते. आता ते अजित पवारांसोबत आहेत. माझ्या जवळचा आहे, माझा निष्ठावंत आहे, असे अनेक जण सांगत असतात. आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो तर अनेक जण आमच्यासोबत फोटो काढतात. फडणवीस साहेब, पवार साहेब तसेच आमच्या सोबत कोणाचे फोटो काढण्याचे लिंकिंग करणे योग्य नाही. योग्य कलम लावून योग्य कारवाई झाली पाहिजे, असंही यावेळी रोहित पवार म्हणाले.

काहींना निधी नसणाऱ्या खात्याचे मंत्री केल्याचं कळतंय : सरकारकडून अजूनही पालकमंत्रिपदाबाबत घोषणा झालेली नाही. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, सरकारकडून मंत्रिपद दिलं गेलंय, पण ठराविक मंत्री सोडले तर कोणी काम करीत नाहीत. बरेच मंत्री नाराज आहेत, काहींना निधी नसणाऱ्या खात्याचे मंत्री केल्याचं कळतंय. जिल्ह्याचे बजेट बघून पालकमंत्री व्हायचे आहे काय, काय गडबड सुरू आहे कळत नाही. जनतेने तुम्हाला बहुमत दिलंय. राज्याला सुरळीत आणि चांगल्या दिशेनेच घेऊन जायला पाहिजे, पण असं न होता पालकमंत्रिपदासाठी भांडत बसलेत, अशी टीकाही यावेळी रोहित पवारांनी केलीय.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्याकांड : अखेर सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंना सीआयडीनं ठोकल्या बेड्या, केज पोलिसांच्या केलं हवाली
  2. अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये-भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.