ETV Bharat / state

बापरे! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुटलेला तुकडा, नेमकं प्रकरण काय? - DOMINOS PIZZA IN BHOSARI

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा सापडलाय. काल रात्री हा सर्व प्रकार घडला आहे.

broken piece of knife was found in Pizza
पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 2:50 PM IST

Updated : Jan 4, 2025, 6:10 PM IST

पुणे- गेल्या काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीचा पिझ्झामध्ये झुरळ सापडल्याचा प्रकार ताजा असतानाच आता भोसरीतील पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडल्यामुळे एकच खळबळ उडालीय. त्यामुळे तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर आतापासूनच सावध होण्याची गरज आहे. कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आल्यानं तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये एका कंपनीच्या पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा सापडलाय. काल रात्री हा सर्व प्रकार घडला आहे.

596 रुपये किमतीचा पिझ्झा ऑर्डर : इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील एका दुकानातून 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला होता. अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच पिझ्झा कंपनीच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मॅनेजरला बसला आश्चर्याचा धक्का : दरम्यान, सुरुवातीला त्यांना पिझ्झा कंपनीच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलीत. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्यालादेखील आश्चर्याचा धक्का बसलाय. या सर्व प्रकारानंतर पिझ्झा कंपनीकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आलेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पिझ्झा कंपनीविरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न आणि औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्याकांड : अखेर सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंना सीआयडीनं ठोकल्या बेड्या, केज पोलिसांच्या केलं हवाली
  2. अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये-भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी

Last Updated : Jan 4, 2025, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.