महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : मित्रांनी तीन मैत्रिणीचे मॉर्फ फोटो सोशल माध्यमात केले व्हायरल, दहावीतील मित्रांवर गुन्हा दाखल - Teen Girls Morphed Photo Viral

Teen Girls Morphed Photo Viral : पुण्यातील एका नामांकीत शाळेतील तीन विद्यार्थिनींचे त्यांच्या मित्रांनी फोटो मॉर्फ करुन ते सोशल माध्यमात व्हायरल केले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Teen Girls Morphed Photo Viral
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 2:29 PM IST

पुणे Teen Girls Morphed Photo Viral :दहावीत शिकणाऱ्या मैत्रिणींचे मॉर्फ केलेले फोटो बालकांनी सोशल माध्यमांवर व्हायरल केल्यानं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एका नामांकीत शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील एका पीडितेच्या आईनं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दहावीत शिकणाऱ्या तीन पीडितांचे मॉर्फ फोटो व्हायरल करण्यात आले होते. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षिकेला याबाबतची माहिती मिळाल्यानं त्यांनी पीडित मुलींच्या घरच्यांना बोलावून हा प्रकार सांगितल्यानं ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे मॉर्फ फोटो व्हायरल :याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी सांगितलं की, "हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर भागात असलेल्या एका नामांकित शाळेत घडला आहे. पीडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावीमध्ये शिकतात. एकाच वर्गात ते शिकत असून एकमेकांचे ते मित्र आहेत. ताब्यात घेतलेला एक विद्यार्थी हा शाळा सोडून गेला असला, तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात होता. वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करुन सोशल माध्यमांवर अपलोड केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. हा सगळा प्रकार शाळेतील एका शिक्षिकेला जेव्हा कळाला, त्यावेळी त्यांनी पीडित विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना बोलावून याबाबतची माहिती दिली. मॉर्फ फोटो व्हायरल झालेल्या 3 पैकी एका पीडित विद्यार्थिनीच्या आईनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे."

आज आरोपींना बाल न्यायालयात करणार दाखल :दहावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी या संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना आज बाल न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

हेही वाचा :

  1. न्यायालयातील चेंबरमध्येच वकिलाचा तरुणीवर बलात्कार ; नोकरीच्या आमिषानं पीडितेला बोलावलं अन् लुटलं सर्वस्व, हाती टेकवले 1500 रुपये - Girl Alleges Rape In Court Chamber
  2. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून, शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक - Bhiwandi Rape News
  3. सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane

ABOUT THE AUTHOR

...view details