मुंबई- महायुतीचे सरकार स्थापन्याकरिता राजकीय हालचाली सुरू असताना भाजपाचे दोन केंद्रीय निरीक्षक मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे त्यांनी सोमवारी सर्व बैठका रद्द केल्या होत्या.
Live Updates- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी पोहोचले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी तब्येत ठीक असल्याचंही सांगितलं.
#WATCH | Delhi: On the question of Maharashtra CM, Union Minister Ramdas Athawale says, " i believe in the meeting that is going to take place tomorrow, bjp observers will listen to all the mlas and the name of devendra fadnavis can be announced tomorrow...eknath shinde does not… pic.twitter.com/52QJ0bMn07
— ANI (@ANI) December 3, 2024
- चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "उद्या होणाऱ्या बैठकीत भाजपचे निरीक्षक सर्व आमदारांचे म्हणणे ऐकतील. उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. एकनाथ शिंदे यांना अडचण नाही. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत. ते केंद्रीय मंत्री बनू इच्छित नाहीत".
- आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांकडून शपथिधी सोहळा तयारीची पाहणी करण्यात आली आहे. "उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पाहणीकेली", असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पहिल्यांदाच महायुतीमधील सर्व घटक पक्षातील नेत्यांनी एकत्रितपणं सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ उपस्थित राहिले.
- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे गटनेते अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना दिल्लीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " काल दादा ( अजित पवार) यांनी अमित शाह यांची भेट मागितली नव्हती. दादा (अजित पवार) हे कुणासाठीही वेटिंगवर नाहीत. ते अमित शाह यांच्या भेटीसाठी आले होते, असे नाही. आज त्यांची भेट होऊ शकते."
खासदार राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप-शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार स्थापनेवरून महायुतीवर टीका केली. ते म्हणाले, " गावागावात फेरमतदन करण्याची मागणी होत आहे. मारकटगावात १४४ गावात कलम लावले आहे. त्यांना घराबाहेर पडू नये, याकरिता धमक्या दिल्या जात आहे. तिथे भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, विजयी उमेदवाराला कमी मतदान झालेले आहे, असा तेथील ग्रामस्थांचा आक्षेप आहे. ही मतदानप्रक्रिया बेकायदेशीर नाही. देशात विरोधक संपविण्याचे प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांचे रुसवे-फुगवे करत आहेत, त्यामागे दिल्लीतील एक महाशक्ती कार्यरत आहे. त्याशिवाय कोणी हिंमत करू शकत नाही. दिल्लीतील महाशक्ती खेळ करत आहे". "राज्यपालांकडे अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे," असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळून 10 दिवस उलटले तरी अद्याप महायुतीनं मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत घोषणा केली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडून जो निर्णय घेण्यात येईल, त्या निर्णयाला पाठिंबा असेल, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे असले तरी गृहमंत्री पदाबाबत महायुतीत एकमत झाले नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे पुन्हा उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबत शिवसेनेकडून निर्णय जाहीर केलेला नाही. शिवेनेसेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन असल्याचं सोमवारी म्हटलं आहे.
हेही वाचा-