पुद्दुचेरी : देशभरात फेंगल चक्रीवादळानं मोठा धुमाकूळ घातला आहे. पुद्दुचेरीमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज पुद्दुचेरीमधील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पुद्दुचेरीत मुसळधार पावसानं हाहाकार उडवला असून नागरिकांच्या घराचं नुकसान झालं असून अनेक हेक्टरवीर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या शाळा आणि महाविद्यालयांना पुद्दुचेरीचे मंत्री ए नमस्सिवयम यांनी सुटी घोषित केली आहे.
आज सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी : फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दीचेरीत मुसळधार पावसानं मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असं पुद्दुचेरीचे शिक्षण मंत्री ए नमस्सिवयम यांनी नमूद केलं आहे. पुद्दुचेरीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. आगामी काळातदेखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नागरिकांच्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत : फेंगल चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानं पुडुचेरी सरकारनं प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे, असं मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी सोमवारी सांगितलं. "फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीत 48 टक्के पाऊस पडला. हा पाऊस अनपेक्षित होता. पुद्दुचेरी सरकारनं चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना 5 हजार रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे," असं मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी माध्यमांना सांगितलं.
फेंगल चक्रीवादळामुळे 10 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान : फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीतील 10 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. या शेतकऱ्यांना सरकारनं मदत जाहीर केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मुसळधार पावसानं पुद्दुचेरीतील 10 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे आम्ही बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 30 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. फेंगल चक्रीवादळानं पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये मोठं नुकसान केलं. नुकत्याच आलेल्या पुरामुळे 50 बोटींचं नुकसान झालं. सरकारनं 50 लाख रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. या बोटींच्या दुरुस्तीसाठी 10 हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पुद्दुचेरीमधील 200 हून अधिक घरं पाण्याखाली : या चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाली. पुद्दुचेरीमधील शंकरापराणी नदीच्या परिसरातील एनआर नगरमधील 200 हून अधिक घरं पाण्याखाली गेली. भारतीय सैन्य दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांनी बचाव कार्य केलं. तरीही या परिसरात राहणारे काही नागरिक अडकून पडले आहेत.
हेही वाचा :