ETV Bharat / state

कोयना धरणातून मंगळवारी सकाळी पाणी सोडणार, 'ईटीव्ही भारत'च्या बातमीचा इम्पॅक्ट! - KOYNA DAM WATER RELEASED

कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याचं वृत्त आज 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलं. त्याची दखल घेत पाणी सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनानं घेतला.

Koyna Dam
कोयना धरण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2024, 9:51 PM IST

सातारा - कोयना धरणातून दीड महिन्यापासून पाणी न सोडल्यानं पुर्वेकडे निर्माण झालेल्या टंचाई संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं आज सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्याची कोयना धरण व्यवस्थापनाने दखल घेतली असून उद्या (मंगळवारी) सकाळी धरणातून कोयना नदीपात्रात पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

कोयना, कृष्णा नदीचं पात्र पडलं कोरडं : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदा सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळं धरण तुडुंब भरलं होतं. १०५.२७ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आजमितीला तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, २३ ऑक्टोंबरपासून आजअखेर पाणी न सोडल्यानं कोयना आणि कृष्णा नद्यांचं पात्र कोरडं पडलं आहे. पात्रात पाण्याची डबकी झाली आहेत. त्या पाण्याचा रंग आणि चव बदलली असून दुर्गंधी देखील येत आहे, असं स्थानिकांनी सांगितलं.

Koyna Dam Water Dispute
कोयना धरणातून पाणी सोडणार (ETV Bharat Reporter)

नदीकाठच्या गावांतील पाणी पुरवठा ठप्प : कोयना आणि कृष्णा नदीतून सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, नदीपात्र कोरड पडल्यानं पाणी योजनांचे जॅकवेल उघडे पडले. परिणामी, अनेक गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला. कळशा, घागरी घेऊन नदीपात्रात साचलेलं पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळं टंचाईची गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली.

कोयना नदीकाठी पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींची कामे सुरू आहेत. त्या कामांमध्ये अडथळा येईल म्हणून धरणातून १५ डिसेंबरनंतर पाणी सोडण्याचं आमचं नियोजन होतं. मात्र, नदीपात्र कोरडं पडल्याने पिण्याच्या पाणी योजना ठप्प झाल्या. पाणी सोडण्याची मागणी आमच्याकडे झाली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कालच (रविवारी) कळवलं आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. : नितीश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग

सरकार स्थापना रखडल्यानं ग्रामस्थांचे हाल : राज्यात महायुतीचं सरकार अद्याप स्थापन झालेलं नाही. त्यामुळं कालवा समितीची बैठकही होऊ शकलेली नाही. कोयना धरणातून पाणी सोडण्याचे कोणी आदेश दिले नाहीत. अशा परिस्थितीत कोयना धरण व्यवस्थापनालाही पाणी सोडण्याचा निर्णय घेता आला नाही. धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाल्यानंतर आता धरण व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून परवानगी घेतली आहे.

या संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलेल्या मूळ बातमीची लिंक :

महायुती सरकारची स्थापना रखडल्यानं शेकडो गावातील ग्रामस्थांचे हाल, कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.